घरताज्या घडामोडीLive Update : अंधार पडला तरीही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Live Update : अंधार पडला तरीही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Subscribe

अंधार पडला तरीही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थी आक्रमक

- Advertisement -

अनिल देशमुख धनंजय मुंडेंच्या भेटीला


भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

- Advertisement -

उर्फीकडून सुरक्षेची मागणी, आयोगाकडे धाव


सत्यजित तांबे, सुधीर तांबेंवर आजच कारवाई होण्याची शक्यता


राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी तूर्तास अटक करणार नाही,

18 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यायला हवी, यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातोय – हायकोर्ट

अश्या पोलीस अधिका-यांना आर्थिक दंड लावून ती रक्कम त्यांच्या पगारातून वगळायला हवी – हायकोर्ट

पोलिसांनी कायदयाचे उल्लंघन करू नये-हायकोर्ट


काही निर्णय योग्य वेळी घ्यावे लागतात

सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचं सूचक विधान

राजकीय धोरणांनुसार निर्णय घ्यावे लागतात


अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण आरोपी शिजान खानला न्यायालयाने जामीन नाकारला

शिजान खानला वसई कोर्टाचा झटका

वसई न्यायालयाचे न्यायमूर्ती आर डी देशपांडे यांनी जामीन नाकारला


उर्फी जावेद महिला आयोगाच्या कार्यलयात दाखल


संपूर्ण महाराष्ट्रात रॅपिडो बाईक सेवा एका आठवड्यासाठी बंद


एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, शासनाकडून 300 कोटींचा निधी उपलब्ध


सत्यजित तांबेना काँग्रेस पाठिंबा देणार नाही – नाना पटोले


कीर्तनकार बंडातात्या कराडकरांना पक्षाघाताचा झटका

बंडातात्या कराडकर वारकरी संप्रदायातले कीर्तनकार

साताऱ्याच्या फलटणच्या निकोप रुग्णालयात उपचारांसठी दाखल

प्रकृती स्थिर, पुढील उपचारासाठी पुण्याला नेणार, डॉक्टरांची माहिती


पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची मागणी


शिर्डी- सिन्नर महामार्गावरील अपघातातील मृत्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश


पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर करण्यासाठी अधिवेशनात सरकारकडे मागणी करणार – अमोल कोल्हे


नाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावरील भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू


अभिनेत्री उर्फी जावेद राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांची भेट घेणार


निधनानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली


सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात

खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात

अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त

आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू आणि राजौरीच्या दौऱ्यावर

गृहमंत्री आज दुपारी जम्मूला पोहोचतील आणि तेथून राजौरीला जातील

गृहमंत्री राजौरीतील डांगरी गावालाही भेट देतील

तिथे स्थानिक लोकांची हत्या करण्यात आली होती

गृहमंत्री मृतांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत

जम्मू राजभवनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतील

त्यानंतर गृहमंत्री स्थानिक भाजप नेत्यांचीही बैठक घेणार आहेत

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे


कोल्हापूर – कोईम्बतूर विमानसेवा आजपासून सुरू होणार

इंडिगो एअरलाइन्सकडून दिली जाणार कोल्हापूर ते कोईम्बतूर विमानसेवा

सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी कोईम्बतूरकडे झेपावणार विमान

कोल्हापूर- अहमदाबाद, कोल्हापूर – हैदराबाद, कोल्हापूर- बंगळूरू नंतर आता इंडिगोकडून कोल्हापूर-कोईम्बतूर विमानसेवा


उत्तराखंडच्या जोशीमठ बाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

स्थलांतर, मदत याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता

आतापर्यंत 700 हून अधिक घरांच्या भिंतींना मोठे तडे

आज मंत्रिमंडळ काय निर्णय घेणार संपूर्ण उत्तराखंड राज्याचे लक्ष


पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली


नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -