घरमनोरंजनउर्फीला मुंबई पोलिसांकडून समन्स; चित्रा वाघांच्या तक्रारीची दखल

उर्फीला मुंबई पोलिसांकडून समन्स; चित्रा वाघांच्या तक्रारीची दखल

Subscribe

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा मुद्दा गाजतोय. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. त्यामुळे पब्लिसिटी स्टंटसाठी ती असं करत असल्याचे अनेकांचे मत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सध्या सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच शुक्रवारी उर्फीने महिला आयोगाकडे धाव घेतली असून चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, अशातच मुंबई पोलिसांनी आता उर्फी जावेदला समन्स बजावलं असल्याची आणखी एक बातमी समोर येत आहे.

अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. तसेच उर्फीला आज पोलिस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, उर्फीने सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी उर्फी जावेदने महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी तिने रुपाली चाकणकर यांची भेट देखील घेतली. यावेळी उर्फीच्या वकीलांनी सांगितली की, भाजपा नेत्या चित्रा वाघ उर्फीला टार्गेट करत आहेत, तसंच तिला जीवे मारण्याची धमकी देखील देत आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

चित्रा वाघ यांच्या त्रासाला कंटाळून उर्फीची महिला आयोगाकडे धाव

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -