घरनवी मुंबईव्यसनमुक्तिसाठी खारघर धावणार, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

व्यसनमुक्तिसाठी खारघर धावणार, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

Subscribe

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने येत्या रविवारी ’एक धाव व्यसनमुक्तिसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ’खारघर मॅरेथॉन २०२३’ आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार्‍या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खारघर येथे झालेल्या बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

पनवेल: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्पर्धेचे सहआयोजक अदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने येत्या रविवारी ’एक धाव व्यसनमुक्तिसाठी’ हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन ’खारघर मॅरेथॉन २०२३’ आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार्‍या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खारघर येथे झालेल्या बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
यावेळी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ आणि मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती प्रविण पाटील, मॅरेथॉन पंच कमिटीचे प्रभारी सुशिल इनामदार, मोना अडवाणी आदी उपस्थित होते.
खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी ९ वाजता होणार आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्या, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रमुख मान्यवर म्हणून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, सुप्रसिद्ध बॉलिवूड हास्य अभिनेता राजपाल यादव, सिने अभिनेता व दिग्दर्शक आदिनाथ कोठारी, सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आमदार ठाकूर यांनी यावेळी दिली. या वर्षीच्या स्पर्धेत १७ हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग नोंदला गेला आहे, अशी माहिती या वेळी परेश ठाकूर यांनी दिली.

१३ गटात स्पर्धा
यंदाची ही स्पर्धा १३ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड २ किलोमीटर, पत्रकार गट २ किलोमीटर अशा १३ गटात ही स्पर्धा होणार असून २ लाख ९६ हजार रुपयांची बक्षिसे आहेत.

- Advertisement -

नाममात्र प्रवेश फी
स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. पुरुष खुला गट व महिला खुला गटासाठी १०० रुपये तर उर्वरित गटांसाठी २० रुपये नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आली आणि ही प्रवेश फी सामाजिक उपक्रमासाठी वापरली जाते. तसेच शाळा आणि गृहसंकुल सोसायटींना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देता यावे, यासाठी त्यांना प्रवेश शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

ही स्पर्धा नेहमी प्रमाणे यशस्वी करण्यासाठी आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे व घेणे, पंच व नियमावली, फिडिंग व स्पंजिंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, बक्षिस वितरण अशा विविध समित्या कार्यरत आहेत.
– प्रशांत ठाकूर,
आमदार; जिल्हाध्यक्ष भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -