घरमुंबईगोखले पुलाच्या बांधकामासाठी मध्यरात्रीचा विशेष मेगाब्लॉक

गोखले पुलाच्या बांधकामासाठी मध्यरात्रीचा विशेष मेगाब्लॉक

Subscribe

२१ व २२ जानेवारी तसेच २४ व २५ जानेवारीच्या मध्यरात्री हा मेगाब्लॉक असणार आहे. रात्री १२.०५ ते पहाटे ४.४५ मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकसाठी काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकलचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

मुंबईः अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पादचारी पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पश्चिम रेल्वेने मध्यरात्रीचा विशेष मेगाब्लॉक घेतला आहे. साडेचार तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे. यासाठी काही लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

२१ व २२ जानेवारी तसेच २४ व २५ जानेवारीच्या मध्यरात्री हा मेगाब्लॉक असणार आहे. रात्री १२.०५ ते पहाटे ४.४५ मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकसाठी काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकलचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अप धिम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे.

- Advertisement -

दुघर्टनेनंतर या पुलाचे बांधकाम पूर्णपणे पाडून नव्याने याचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूकही करण्यात आली. पुलाच्या नवीन बांधकामासाठी १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

गोखले पुलाचा मुद्दा नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. गोखले पूल बंद करण्यात आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. या पुलाचे काम रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी 82 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यापैकी 17 कोटी रेल्वेला देण्यात आले आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितले. या पुलाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. गोखले पुलाची पहिली मार्गिका मार्च 2023पर्यंत तर दुसरी मार्गिका डिसेंबर 2023पर्यंत सुरू करणार असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.

- Advertisement -

११ जानेवारीला या पुलाच्या पाडकामास सुरुवात झाली. या पुलाचे बांधकाम लवरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी चार साडेचार तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -