घरमनोरंजनमणिकर्णिका Trailer: 'हे' डायलॉग्ज इंटरनेटवर सुपरहिट

मणिकर्णिका Trailer: ‘हे’ डायलॉग्ज इंटरनेटवर सुपरहिट

Subscribe

सध्या सोशल मीडियावर मणिकर्णिकाच्या ट्रेलरमधील असेच काही डायलॉग्ज सुपरहिट ठरत आहेत. नेटिझन्सकडून या संवादांना पसंती मिळते आहे. 

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती या ट्रेलरलाच मिळते आहे. काही नेटिझन्सनी ट्रेलरमधील कंगना रणौतच्या अभिनयाची आणि तिच्या डायलॉग डिलीव्हरीची खिल्ली उडवली आहे. मात्र, दुसरीकडे कंगनाच्या चाहत्यांनी मणिकर्णिकाच्या ट्रेलरला भरभरुन पसंती दिली आहे. युट्यूब, फेसुबक सारख्या सर्वच सोशल माध्यमांवर सध्या याच ट्रेलरचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. मुख्यत्वे करुन प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे ते मणिकर्णिकाच्या ट्रेलरमधील दमदार डायलॉग्जनी. ट्रेलरमध्ये दाखवले गेलेले युध्दाचे थरारक प्रसंग, ब्रिटीशांविरुद्ध भारतीयांमध्ये असलेला आक्रोश आणि झाशीची राणी अर्थात मणिकर्णिकाची इंग्रजांना हरवण्याची ठाम भूमिका, अशा सर्वच प्रसंगाना अनुसरुन लिहीण्यात आलेले दमदार डायलॉग्ज ट्रेलरा चारचांद लावत आहेत. सध्या सोशल मीडियावर मणिकर्णिकाच्या ट्रेलरमधील असेच काही डायलॉग्ज सुपरहिट ठरत आहेत. नेटिझन्सकडून या संवादांना पसंती मिळते आहे.

‘मणिकर्णिका’चे सुपरहिट डायलॉग्ज :

  • जब बेटी उठ खडी होती है, तभी विजय बडी होती है
  • मैं लक्ष्मीबाईस प्रतिज्ञा करती हूं, जब तक मेरे शरीर में रक्त है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करुंगी
  • मैं वो मशाल बनूंगी जो हर भारतीयों के अंदर आजादी की भूख बनकर दहकेगी
  • झांसी आप भी चाहते हैं और मैं भी. फर्क सिर्फ इतना है कि आपको राज करना है और मुझे इसकी सेवा
  • अंग्रेजी सत्ता तुम्हारी मिसाल बनाना चाहती है, लटकाना चाहती है तुम्हारे कटे हुए सिर को झांसी में
  • हम लढेंगे ताकि आनेवाली पीढियां अपनी आजादी का उत्सव मनाएं
  • हम लढेंगे और छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के सपने को पुनः जीवित करेंगे
  • मैं अपनी झांसी नहीं दुंगी

‘मणिकर्णिका’ चित्रपटामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रमुख भूमिकेत कंगना रनौत असून, तिचा लढाऊ बाणा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट पुढील वर्षात २५ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शीत होणार आहे. या सिनेमासाठी तिने घोडेस्वारीसोबत तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. यामध्ये तिने अनेक स्टंटदेखील केले आहेत. अनेक स्टंट करण्यासाठी तिने बॉडी डबलची मदत घेतलेली नाही. अनेक स्टंट तिने स्वतः केलेले आहेत. युद्धभूमीवरील थरारक प्रसंग, मणिकर्णिका ते राणी लक्ष्मीबाईचा प्रवास आणि देशासाठी प्राण पणाला लावण्याची भावना याचे सुंदर चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -