घररायगडमीटर कॅलिब्रेशनच्या नावावर आरटीओ विभागात भ्रष्टाचार?;  रिक्षा चालकांकडून उकळण्यात येत आहेत दीडशे...

मीटर कॅलिब्रेशनच्या नावावर आरटीओ विभागात भ्रष्टाचार?;  रिक्षा चालकांकडून उकळण्यात येत आहेत दीडशे रुपये

Subscribe

मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडून लूट केली जात असल्याचा आरोप काही रिक्षा चालकांनी केला आहे.कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांकडून दंडाच्या रकमेसोबतच अतिरिक्त दीडशे रुपये उकळले जात असून, या रकमेची पावती सुद्धा दिली जात नसल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे. रिक्षा संघटनांनी भाडे दर वाढीच्या केलेल्या मागणीनंतर २२ डिसेंबरपासून भाडे वाढ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र या करता नव्या दराप्रमाणे मीटर कॅलिब्रेशन करण्याची अट प्रादेशिक परिवहन विभागाने ठेवली आहे.

पनवेल: मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडून लूट केली जात असल्याचा आरोप काही रिक्षा चालकांनी केला आहे.कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांकडून दंडाच्या रकमेसोबतच अतिरिक्त दीडशे रुपये उकळले जात असून, या रकमेची पावती सुद्धा दिली जात नसल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे. रिक्षा संघटनांनी भाडे दर वाढीच्या केलेल्या मागणीनंतर २२ डिसेंबरपासून भाडे वाढ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र या करता नव्या दराप्रमाणे मीटर कॅलिब्रेशन करण्याची अट प्रादेशिक परिवहन विभागाने ठेवली आहे.या करता १५ जानेवारी पर्यतची मुदत रिक्षा चालकांना देण्यात आली होती.मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न करणार्‍या रिक्षा चालकांना दर दिवशी ५० रुपये दंड आकरला जाणार असल्याने दंडापासून वाचण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालया बाहेर रिक्षा चालकांच्या मोठ्या रांगा सध्या लागल्या आहेत. याचाच फायदा उचलण्यासाठी सक्रिय झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांकडून दंडा च्या रकमे सोबत अतिरिक्त दीडशे रुपये वसुल केले जात असून या रकमेची कोणतीही पावती रिक्षा चालकांना दिली जात नसल्याने रिक्षा चालक संताप व्यक्त करत आहेत.

खासगी दलाल करत आहेत. वसुली?
मीटर प्रामाणित केल्याची पावती दाखवल्यानंतर त्याची नोंद प्रादेशिक विभाग करून घेते. त्या नंतर दर दिवशी ५० रुपये प्रमाणे दंडाची रक्कम वसुल करून त्या रकमेची पावती रिक्षा चालकांना दिली जाते. मात्र या रकमे सोबत अतिरिक्त वसुल करण्यात येणार्‍या दीडशे रुपयांची पावती दिली जात नसून, खासगी दलाल ही सगळी वसुली करत आहेत असा आरोप रिक्षा चालक करत आहेत.

- Advertisement -

मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांकडून दंडाच्या रकमेसोबत अतिरिक्त दीडशे रुपये वसुल केले जात आहेत. मात्र या रकमेची पावती रिक्षा चालकांना दिली जात नाही.
– आत्माराम म्हसकर.

अध्यक्ष,स्थानिक प्रकल्पग्रस्थ संघटना कामोठे – जुई.

- Advertisement -

प्रादेशिक परिवहन विभागाकडून बिना पावती कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही. जर असा कोणताही प्रकार रिक्षा चालकंच्या निदर्शनास येत असेल तर या बाबतची तक्रार रिक्षा चालकांनी करावी. प्रादेशिक परिवहन विभागाकडून या विरोधात कारवाई करण्यात येईल.त्याच प्रमाणे दंड आकरण्यासाठी कोणत्याही खासगी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
– अभय देशपांडे.
उप प्रादेशिक अधिकारी, पनवेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -