घरअर्थजगतअदानी ग्रुपचे शेअर्स आजही धडाधड कोसळले; हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर उद्योगजगतात खळबळ!

अदानी ग्रुपचे शेअर्स आजही धडाधड कोसळले; हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर उद्योगजगतात खळबळ!

Subscribe

अदानी ग्रूपला शेअर बाजारात मोठा धक्का बसलाय. अदानी ग्रुपच्या शेअर्सबाबत हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रूपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत.

अदानी ग्रुपला शेअर बाजारात मोठा धक्का बसलाय. अदानी ग्रुपच्या शेअर्सबाबत हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. ही घसरण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आजही अदानी ग्रुपच्या शेअरर्समध्ये होत असलेली घसरण कायम असून, तब्बल २५ टक्क्यांपर्यंत आली आहे. बुधवारपेक्षाही मोठी घसरण आज दिसून येत आहे.

हिंडेनबर्ग एका सुप्रसिद्ध यूएस शॉर्ट सेलरने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. अदानी कंपन्यांनी कर्जासाठी स्टॉकचे शेअर्स गहाण ठेवण्यासह अनेक कर्ज घेतले आहे, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. तसंच अदानी समूहावर शेअरच्या मूल्यांच्या बाबतीत हेराफेरीचा आणि फसवणुकीचा ठपका या रिपोर्टमध्ये लावण्यात आलाय. हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर शेअर बाजारात मात्र एकच खळबळ माजली. गौतम अदानी यांचे अवघ्या २ दिवसांत २.३७ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं, आज त्यापेक्षा मोठं नुकसान झालं आहे. अदानी ग्रूपचा सर्वात मौल्यवान स्टॉक असलेल्या अदानी टोटल गॅसच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या २ दिवसांत ७६ हजार कोटींची घट झाली आहे. त्याच वेळी अदानी ट्रान्समिशनचं बाजार भांडवल ६३,७०० कोटी रुपयांनी कमी झालं आहे.

- Advertisement -

डॅनी ग्रीन एनर्जी २० टक्क्यांनी कमी झाली
अदानी ग्रीन एनर्जी २० टक्क्यांनी घसरून १४८६ रुपयांच्या पातळीवर आहे. हा ५२ आठवड्यांचा नवा नीचांक आहे. अदानी ट्रान्समिशन २०१४ रूपयांवर २० टक्क्यांनी घसरलं आहे. ५२ आठवड्यांचा नीचांक १८१० रूपये आहे. अदानी पोर्ट्स २५ टक्क्यांनी घसरले. अदानी पॉवर ५ टक्क्यांनी घसरले आणि २४८ रूपयांच्या पातळीवर आहे. अदानी विल्मार ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह ५१६ वर आहे.

- Advertisement -

ACC, अंबुजा, NDTV २५% पर्यंत खाली
अदानी समूहाने अंबुजा सिमेंट, एसीसी सिमेंट आणि एनडीटीव्हीही विकत घेतले आहेत. या शेअर्समध्येही विक्री होत आहे. ACC १५ टक्क्यांच्या घसरणीसह १८५० च्या खाली आहे. अंबुजा सिमेंट्स व्यवहारादरम्यान २५ टक्क्यांनी घसरले आणि ३४५ रुपयांपर्यंत घसरले. NDTV ५ टक्क्यांच्या घसरणीसह २५६ रुपयांच्या पातळीवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -