घरदेश-विदेशगुजरातमध्ये नोकर भरतीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द, उमेदवारांमध्ये संताप

गुजरातमध्ये नोकर भरतीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द, उमेदवारांमध्ये संताप

Subscribe

गुजरात सरकारने कनिष्ठ लिपिक पदाच्या ११८१ जागांसाठी भरतीची जाहिरात दिली होती. या पदासाठी नऊ लाख उमेदवारांनी अर्ज भरला. ही परीक्षा रविवारी ११ वाजता होणार होती. पेपर फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले. 

गुजरातः गुजरात येथील कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीचा परीक्षा पेपर रविवारी फुटला. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत.

गुजरात सरकारने कनिष्ठ लिपिक पदाच्या ११८१ जागांसाठी भरतीची जाहिरात दिली होती. या पदासाठी नऊ लाख उमेदवारांनी अर्ज भरला. ही परीक्षा रविवारी ११ वाजता होणार होती. पेपर फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

परीक्षेचा पेपर फुटल्याने उमेदवारांमध्ये संताप उफाळून आला. उमेदवारांनी बसेसच्या काचा फोडल्या. चक्का जाम केला. काही ठिकाणी टायर जाळल्याची घटना घडली. नोकर भरती रद्द झाल्याने उमेदवारांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी निषेध नोंदवला. पोलिसांनी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नोकर भरती परीक्षा पेपर फुटीवर गुजरात दहशतवाद विरोधी पथक गेल्या काही दिवसांपासून लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच कनिष्ठ लिपिक पदाचा परीक्षा पेपर फुटल्याचे उजेडात आले. वडोदरा येथे दहशतवाद विरोधी पथकाने पेपर फुटी प्रकरणी १५ जणांना ताब्यात घेतले आहे. हा पेपर कसा फुटला. यामागे नेमका कोणाचा हात आहे. अजून कोणाचा यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाचे एसपी सुनील जोशी यांनी सांगितले की, नोकर भरती परीक्षेचा जो पेपर फुटला तो आंध्र प्रदेश येथून आला होता. पेपर फुटीचे धागे ओडिसा व बिहारपर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी ओडिसा येथील नायक नावाच्या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अजून एक मुख्यसुत्रधार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गुजरात दहशतवाद विरोधी पथक ओडिसाला जाणार आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये रोष आहे. ही परीक्षा पुन्हा कधी होणार आहे याची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल. मात्र हा पेपर फोडणाऱ्या दोषींवर तातडीने गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -