घरअर्थजगतBudget 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा, बचत योजनेतील मर्यादा वाढवली

Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मोठी घोषणा, बचत योजनेतील मर्यादा वाढवली

Subscribe

Budget 2023 for Senior Citizen | ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता देत त्यांच्यासाठी असलेली बचत मर्यादा दुपट्टीने वाढवली आहे.

Budget 2023 for Senior Citizen | नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केले. आपल्या ८७ मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली. तसंच, अनेक नव्या घोषणाही करण्यात आल्या. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता देत त्यांच्यासाठी असलेली बचत मर्यादा दुपट्टीने वाढवली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खाते योजनेची मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख करण्यात आली आहे. तसंच, विविध खात्यांसाठी असलेल्या ठेवींचीही व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ज्या अंतर्गत वैयक्तिकपातळीवर ज्येष्ठ नागरिक ९ लाखापर्यंत रक्कम जमा करू शकतात. पूर्वी याची मर्यादा ४.५ लाख होती. तर, जॉईंट अकाऊंटला जमा करण्यात येणाऱ्या रक्कमेची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा Union Budget 2023 : संरक्षण क्षेत्रासाठी 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद; 12.95 टक्के वाढ

पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक खातं उघडू शकतात. तसंच, ५५ ते ६० सालापर्यंत निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्याच्या एक महिन्याच्या आत गुंतवणूक करण्याच्या इराद्याने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. तसंच, या योजनेतून ज्येष्ठ नागरिक पती-पत्नींचं जॉईंट अकाऊंटही खोलता येऊ शकेल.

- Advertisement -

सरकारकडून महिलांसाठी मोठं गिफ्ट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. यानुसार महिला बचत सन्मान पत्र आणले गेले आहे. यानुसार महिला दोन लाखांपर्यंतची गुंतवणूक दोन वर्षांकरता करु शकणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेविषयी माहिती देताना म्हटलं की, या बचत योजनेचा लाभ गृहिणी २०२५ पर्यंत घेऊ शकतात. महिला या योजनेत २ लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात. यातून त्यांना तब्बल ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. तर, या गुंतवणुकीतून महिला छोट्या छोट्या रक्कमाही काढू शकतात.

निवृत्तीवेतन

2022-23 या आर्थिक वर्षातील 2.07 लाख कोटी रूपयांच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात हा खर्च सुमारे 2.45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे. संरक्षण कर्मचार्‍यांना एक रँक एक पेन्शन -OROP अंतर्गत द्यायची थकबाकी, हे या वाढीमागचे मुख्य कारण आहे. 2023 – 24 या आर्थिक वर्षात निवृत्तीवेतन देयकांची रक्कम 2.34 लाख कोटी रूपये इतकी अपेक्षित आहे, हे प्रमाण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 0.8 टक्के इतके आहे. यात संरक्षण क्षेत्रातील निवृत्ती वेतनापोटीच्या सुमारे 1.38 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे.

हेही – Union Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी मोठ्या घोषणा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -