घरताज्या घडामोडीजागतिक कर्करोग दिन 2023: पुरुषांनाही होऊ शकतो कॅन्सरचा धोका, 'या' लक्षणांकडे करू...

जागतिक कर्करोग दिन 2023: पुरुषांनाही होऊ शकतो कॅन्सरचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Subscribe

जागतिक कर्करोग दिन दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस खूप महत्त्वाचा असून लोकांना कर्करोगाबद्दल जागरुक करणे हा त्यामागील उद्देश असतो. विविध प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. तोंडाचा कर्करोग हा देखील असाच एक झपाट्याने वाढणारा धोका आहे. भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजे कॅन्सर आहे. जेव्हा लोकांना कॅन्सर या आजाराबद्दल जाणीव होते. तेव्हा ते अधिक प्रमाणात घाबरून जातात. पुरुषांनाही कॅन्सरचा धोका होऊ शकतो. त्यांच्यामध्येही विविध प्रकारची लक्षणं आढळून येतात. परंतु या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते.

कॅन्सरमुळे काही लोकांना जेवण करताना किंवा कोणतंही पदार्थ खाताना त्यांना गिळताना त्रास होतो. तुमचे वजन अचानक कमी होत असल्यास किंवा गिळण्यास त्रास होत असल्यास आणि उलट्या होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना दाखवावे. यावर डॉक्टर तुमच्या घशाचा किंवा पोटाचा आजार तपासू शकतात.

- Advertisement -

लघवीला त्रास – काही पुरुषांमध्ये लघवीशी संबंधित समस्या वयानुसार वाढते. रात्री पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये जावे लागते. काही वेळा लघवीवर नियंत्रण ठेवणेही शक्य होत नाही. लघवी करताना जळजळ जाणवते आणि कधीकधी त्यातून रक्तही येऊ लागते. ही लक्षणं प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे जाणवतात. हे प्रोस्टेट कर्करोग देखील असू शकते. तुम्हाला अशी कोणतीही समस्या जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. ते तुमचे रक्त किंवा प्रोस्टेट तपासू शकतात.

त्वचेत बदल – जर तुमच्या त्वचेवर तीळ किंवा चामखीळ असेल तर त्याच्या आकारात किंवा रंगात बदल होऊ शकतो. त्वचेवर काही डाग अचानक दिसू शकतात. तुम्हाला असे काही दिसले तर निष्काळजीपणा न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

- Advertisement -

छातीत जळजळ – जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ होत असेल आणि आहार बदलूनही जळजळ कमी होत नसेल, तर तुम्ही ते गांभीर्याने घ्या. जास्त छातीत जळजळ पोट किंवा घशाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते.

तोंडाचा कॅन्सर – तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या तोंडावर आणि ओठांवर पांढरे, लाल, तपकिरी किंवा पिवळे डाग दिसू शकतात.

वजन कमी होणे – जर तुमचे वजन कमी होत असेल, तर ते तणाव किंवा थायरॉईडमुळे असू शकते. या समस्यांव्यतिरिक्त जर तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ते स्वादुपिंड, पोट किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

थकवा – अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये खूप थकवा जाणवतो. पूर्ण विश्रांती घेऊनही हा थकवा जात नाही. हा थकवा खूप कामानंतरच्या थकव्यापेक्षा वेगळा असतो.

खोकला – जास्त प्रमाणात खोकला येणं हे सहसा कॅन्सरचे लक्षण नसते आणि तो 3-4 आठवड्यांत आपोआप बरा होतो. परंतु जर तुमचा खोकला 4 आठवड्यांनंतरही कायम राहिला आणि त्यासोबत तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने जागतिक कर्करोग दिन हा एक “जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम” म्हणून घोषित केला आहे. जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन कर्करोग ओळखणे, काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ किंवा आशा देणे, असा त्याचा अर्थ आहे.


हेही वाचा : येत्या रविवारी होणाऱ्या सकल हिंदू मोर्चाचे चित्रीकरण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -