घरताज्या घडामोडीतुर्कस्तान-सीरिया भूकंप: ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईने मृत्यूपूर्वी दिला मुलाला जन्म, व्हिडीओ व्हायरल

तुर्कस्तान-सीरिया भूकंप: ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईने मृत्यूपूर्वी दिला मुलाला जन्म, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या भूकंपातील मृतांचा आकडा 4 हजार 300च्या पुढे गेला असून, आखडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच या भूकपानंतर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या भूकंपातील मृतांचा आकडा 4 हजार 300च्या पुढे गेला असून, आखडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच या भूकपानंतर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईने आपले प्राण सोडण्याआधी मुलाला जन्म दिल्याचे समजते. या घटनेचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या गर्भवती महिलेचा मुलाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. तसेच, ढिगाऱ्याखालून या मुलाच्या रडण्याचा आवाज आल्यावर बचाव पथकाने त्याला वाचवले. (Turkestan Syria Earthquake women gave birth to a child video viral)

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचा जन्म दिला तेव्हा आई सीरियातील अलेप्पो येथे झालेल्या भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यावेळी आईने मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्याचा आवाज ऐकला आणि नंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजते. त्यावेळी उपस्थित बचाव पथकाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला वाचवले. सध्या बाळ सुरक्षित असून, त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे वित्तहानीसह मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी होती. या भूकंपामुळे 4300हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय हजारो लोक बेपत्ता असून हजारो जखमीही आहेत. येथे सर्वत्र ढिगारा दिसत असून बचावकार्य सुरू आहे.

- Advertisement -

तुर्कस्तानमध्ये सोमवारपासून आतापर्यंत 4 भूकंप झाले आहेत. 24 तासांत झालेल्या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 7.8, 7.6, 6.0 आणि 5.6 इतकी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) दावाही समोर आला आहे. भूकंपामुळे मृतांची संख्या 8 पटीने वाढू शकते, असे WHO ने म्हटले आहे. दरम्यान, तुर्कस्तानमधील भूकंपातील मृतांची संख्या 8 पट वाढू शकते, असा दावा WHO ने केला आहे.


हेही वाचा – वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार लढत; शिंदे गटाकडून तयारीला सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -