घरमनोरंजनहार्दिक पंड्या लग्नाच्या 3 वर्षांनंतर पुन्हा धूमधडाक्यात करणार लग्न

हार्दिक पंड्या लग्नाच्या 3 वर्षांनंतर पुन्हा धूमधडाक्यात करणार लग्न

Subscribe

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टेवोविकसोबत दुसऱ्यांदा पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहे. यापूर्वी त्यांनी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. दरम्यान, लग्नाच्या 3 वर्षानंतर हार्दिक-नताशा पुन्हा बोहोल्यावर चढणार आहेत.

14 फेब्रुवारीला होणार लग्न

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि नताशा राजस्थानातील उदयपुरमध्ये ग्रँड लग्न करणार आहेत. 13 फेब्रुवारीपासून लग्नाच्या इतर कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. खरं तर हार्दिक आणि नताशाचे 3 वर्षापूर्वी घाईगडबडीत अचानक लग्न झाले होते त्यांच्या पहिल्या लग्नावेळी नताशा गरोदर होती. त्यामुळे त्यांना पहिले लग्न धूमधडाक्यात करता आले नाही.

Hardik Pandya Wife Natasha Stankovic Was In Relationship With Tv Actor Aly  Goni | Hardik Pandya से पहले इस टीवी स्टार की गर्लफ्रेंड थीं नताशा, नाइट  क्लब में हुई थी भारतीय ऑलराउंडर

- Advertisement -

मात्र, त्यांच्या मनात धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे यावेळी ते लग्नात मेहंदी, हळद, ढोल धमाका आणि संगीत अशा पांरपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. दरम्यान, आता या बातमीमुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले असून लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत.


हेही वाचा :

कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -