घरदेश-विदेशअमेरिकेनंतर आता चीनमध्येही आकाशात घिरट्या घालणारी रहस्यमय वस्तू

अमेरिकेनंतर आता चीनमध्येही आकाशात घिरट्या घालणारी रहस्यमय वस्तू

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत आकाशात रहस्यमय वस्तू घिरट्या घालताना दिसत आहेत. अमेरिकानंतर आता कॅनडातही अशीच रहस्यमय वस्तू आकाशात घिरट्या घालताना दिसून आली.

Mysterious object: गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत आकाशात रहस्यमय वस्तू घिरट्या घालताना दिसत आहेत. अमेरिकानंतर आता कॅनडातही अशीच रहस्यमय वस्तू आकाशात घिरट्या घालताना दिसून आली. ही वस्तू दिसताच अमेरिकन फायटर जेटने ती पाडण्यात आली.
अनेक संशयास्पद वस्तू पाहायला मिळत आहेत. अमेरिकेशिवाय आता कॅनडा आणि कॅलिफोर्नियापर्यंत ही वस्तू दिसली आहे. कॅनडा सीमेजवळ मिशिगनमधील हुरॉन सरोवरावर आणखी एक रहस्यमय वस्तू उडताना दिसली आहे. १२ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या फायटर जेटने ही रहस्यमय वस्तू पाडली होती. अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात अशी गूढ वस्तू पाहण्याची ही चौथी घटना आहे.

यूएस हवाई दलाचे जनरल ग्लेन व्हॅनहर्क, ज्यांना यूएस एअरस्पेसचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, या रहस्यमय वस्तू काय आहेत, त्या उंचावर कशा पोहोचतात आणि ते कोठून येत आहेत हे लष्कराला ओळखता आलेले नाही. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) आणि नॉर्दर्न कमांडचे प्रमुख व्हॅनहर्क म्हणाले, “आम्ही सध्या त्यांना संय़सास्पद वस्तू म्हणत आहोत, बलून नाही. या वस्तूंची चौकशी आता इंटेल कम्युनिटी आणि काउंटर इंटेलिजन्स कम्युनिटीद्वारे केली जाईल.”

- Advertisement -

अमेरिकन फायटर जेटने ही वस्तू नष्ट केली
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.४२ वाजता अमेरिकन फायटर प्लेन F-16 ने ही रहस्यमय वस्तू खाली पाडली. पेंटागॉनचे प्रवक्ते पॅट्रिक रायडर यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, यूएस-कॅनडा सीमेवरील हुरॉन सरोवरावर फिरणारं फ्लाइंग ऑब्जेक्ट खाली पाडण्यात आलं आहे. अलिकडच्या आठवड्यात उत्तर अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या असामान्य वस्तूंवरून या घटनेमुळे चीनसोबतचा तणाव आणखी वाढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -