घरमहाराष्ट्रआमचे सरकार आल्यावर शेतकऱ्याला २५०० क्विंटल भाव देऊ - शरद पवार

आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्याला २५०० क्विंटल भाव देऊ – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँगेस आणि काँगेसचे सरकार आल्यास येथील शेतकऱ्यांना २५०० रुपये भाव देणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोंदिया येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.

दुष्काळाची स्थिती असताना केंद्र पथकाचा विदर्भात एकही दौरा झाला नाही. त्यामुळे राज्य शासन विदर्भाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. आज नजीकचा छत्तीसगड राज्याचा विचार केला असता येथील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना २५०० क्विंटल इतका भाव मिळत आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना १ हजार ७४० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या निवडणुकीत सत्ता पालटण्याची चिन्ह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आल्यास येथील शेतकऱ्यांना २५०० रुपये भाव देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गोंदिया येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. तसेच पुणे येथील जागा वाटप बद्दल घोळ आज उद्या मध्ये पूर्णत्वास येणार असल्याचे देखील यावेळी ते  म्हणाले.

कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान 

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसला होता. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. या संतपत शेतकऱ्यांनी कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम थेट पंतप्रधान मोदींना पाठवल्यानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून कांदे उत्पादकांना किलोमागे फक्त १ ते २ रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला होता. कांदा उत्पादकांना हवा तसा भाव मिळत नसल्याने नाशिकच्या निफाडमध्ये राहणाऱ्या संजय साठेंनी ७५० किलो कांदा विकला आणि त्यातून त्यांना मिळणारी रक्कम मोदी सरकार देण्यात आली आहे. साठेंनी ७५० किलो कांदा विकल्यानंतर फक्त १ हजार ६४ रुपये मिळाले होते. ही कमाई त्यांनी पंतप्रधान मोदींना मनीऑर्डरनं पाठवली होती. त्यानंतर पीएमओनं या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्याला २५०० क्विंटल भाव देऊ अशी घोषणा शरद पवारांनी केली आहे.

- Advertisement -

वाचा – कांदा उत्पादकांना मिळणार दिलासा

वाचा – केंद्राचे नाफेडला २५ हजार मेट्रिक टन कांदा साठवणुकीचे आदेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -