घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलीस भरती : लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्यांची यादी जाहीर, 'इतके' झाले उत्तीर्ण

पोलीस भरती : लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्यांची यादी जाहीर, ‘इतके’ झाले उत्तीर्ण

Subscribe

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी दिलेल्या ११ हजार २४४ उमेदवारांपैकी ४ हजार ५१८ जणांना २५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या उमेदवारांमधून १.१० या प्रमाणात १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सर्व घटकात लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. त्यामुले लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा तारीख कळविली जाणार आहे. उमेदवारांना काही अडचणी असल्यास नियंत्रण कक्ष ०२५३-२२००४०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या १६४ जागांसाठी तब्बल १८ हजार ९३५ उमेदवारांनी सादर केले होते. पोलीस भरती प्रक्रियेतील पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, आडगाव येथे ४ ते २० जानेवारी २०२३ या कालवधीत झाली. १८ हजार ९३५ पैकी १३ हजार ८३ उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. ६९ टक्के उमेदवारांची उपस्थित होती. तर ५ हजार ८४९ उमेदवारांनी दांडी मारली. त्यातील ११ हजार २४४ उमेदवार शारीरिक मोजमाप व कागदपत्र पडताळणीत पात्र ठरले. त्यामुले त्यांची मैदानी चाचण्या घेण्यात आल्या.

- Advertisement -

उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुण नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. उमेदवारांच्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत व त्यांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांबाबत काही तक्रारी असल्यास नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण येथे तक्रार घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत व इतर विषयांबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या. तर काही उमेदवारांनी मार्गदर्शनही मागितले होते. अशा उमेदवारांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले. ते ३० जानेवारी २०२३ व १० फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -