घरमहाराष्ट्रनवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ; शिवडी सत्र न्यायालयाने फेटाळला 'हा' अर्ज

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ; शिवडी सत्र न्यायालयाने फेटाळला ‘हा’ अर्ज

Subscribe

अमरावतीतून नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचा दाखला सादर करुन ही निवडणूक लढवली. मात्र त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला यात तफावत आढळून आली. त्यामुळे नवनीत राणा, वडिल हरभजन सिंग कुंडलेस व राम सिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्याता गुन्हा दाखला करण्यात आला.

 

मुंबईः खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांना फरार घोषित करण्याचे महानगर दंडाधिकारी यांचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी करणारा अर्ज शिवडी सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

- Advertisement -

अमरावतीतून नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचा दाखला सादर करुन ही निवडणूक लढवली. मात्र त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला यात तफावत आढळून आली. त्यामुळे नवनीत राणा, वडिल हरभजन सिंग कुंडलेस व राम सिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्याता गुन्हा दाखला करण्यात आला. त्याची नोंद करुन घेत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या वडिलांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले. नवनीत राणा ह्या संसदेत असल्याने त्या सुनावणीसाठी हजर राहिल्या नाहीत. मात्र त्यांचे वडिलही हजर झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा न्यायालयाने समन्स जारी केले. तरीही नवनीत राणा यांचे वडिल हजर राहिले नाहीत. परिणामी न्यायालयाने हरभजन यांना फरार घोषित केले. याविरोधात नवनीत राणा यांनी शिवडी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करुन न्यायालयाने याचा निकाल राखून ठेवला होता.शुक्रवारी निकाल देत न्यायालयाने नवनीत राणा यांचा अर्ज फेटाळून लावला.

खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी रद्द केले होते. याशिवाय राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे . उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्ज देताना दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीसंदर्भांत दिलेले प्रमाणपत्र हे बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -