घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय

उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय

Subscribe

काँग्रेस, स्वाभिमानी लोजपसह अनेक पक्षांचे चिन्ह गोठवल्याचा आत्तापर्यंतचा इतिहास

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपविण्याचा निर्णय आज, शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत दिलेल्या निर्णयांचा आढावा घेतल्यास शिवसेनेबाबतचा निर्णय हा ऐतिहासिकच ठरला आहे. पक्षफुटीच्या अनेक प्रकरणांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस, स्वाभिमानी आणि लोजपसह अनेक पक्षांचे चिन्ह गोठवल्याचा इतिहास आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्षाची सूत्रे आणि धनुष्यबाण चिन्ह गेले.

काँग्रेसचे बैलजोडी चिन्ह गोठवून दिले गायवासरू
१९५१ साली राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाले, तेव्हा काँग्रेसने ‘बैलजोडी’ हे चिन्ह निवडले.१९७१ साली काँग्रेस पक्षात फूट पडली, तेव्हा निवडणूक आयोगाने बैलजोडी हे चिन्ह गोठवले आणि काँग्रेसला ‘गाय-वासरू’ हे चिन्ह मिळाले.

- Advertisement -

गायवासरू चिन्ह गोठवून काँग्रेसला दिला ‘हाताचा पंजा’
काँग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष. काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बैलजोडी हे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह स्वीकारले होते. त्यानंतर काँग्रेसने हे चिन्ह बदलून इंदिरा गांधींच्या कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय-वासरू हे चिन्ह घेतले. त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यावर गाय-वासरू हे निवडणूक चिन्ह गोठविल्याने इंदिरा काँग्रेसने ‘हाताचा पंजा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.

जनता पार्टीचे नांगरधारी शेतकरी चिन्ह गोठवले होते
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर 1977 मध्ये सत्तेत आलेल्या जनता पार्टीचे चिन्ह ‘नांगरधारी शेतकरी’ होते. जनता पार्टीत विलीन झालेल्या भारतीय जनसंघाचे ‘पणती’ हे चिन्ह गोठविण्यात आले. पुढे जनता पार्टीत फूट पडल्यावर स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने ‘कमळ’ चिन्हाचा स्वीकार केल्यानंतर ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह गोठविण्यात आले.

- Advertisement -

साम्यवादी पक्षपण दूर नाहीत
सातत्याने होणार्‍या फाटाफुटीमुळे जुने निवडणुक चिन्ह गोठविले जाऊन नवे चिन्ह स्वीकारण्यापासून देशातील डावे व साम्यवादी पक्षपण दूर राहिले नाहीत. भारतातील साम्यवाद्यांमध्ये 1964 मध्ये फूट पडल्यानंतर भारतीय साम्यवादी पक्षाने ‘विळा आणि कणीस’ हे परंपरागत, तर मार्क्स वादी साम्यवादी पक्षाने ‘विळा-हातोडा व एक तारा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.

स्वाभिमानची शिट्टी आणि जनसुराज्यचे नारळ चिन्ह पण गोठवले
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता मिळवलेल्या स्वाभिमानी पक्षाची ‘शिट्टी’ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे ‘नारळ’ हे चिन्हही आता इतिहासजमा झाले आहे. स्वाभिमानी व जनसुराज्य शक्ती या दोन पक्षांचे चिन्ह गोठवण्यात आले आहे.

शेकापचे बैलगाडी खटारा गोठवले आणि 30 वर्षांनी परतही दिले
शेतकरी कामगार पक्षाचे ‘बैलगाडी’ (खटारा) हे चिन्हही १९९० साली अपेक्षित आमदार, खासदार व मतांची टक्केवारी नसल्याने गोठवण्यात आले होते. त्यानंतर २०१४ साली या पक्षाने याविरोधात आयोगाकडे दाद मागितली होती, त्याची दखल घेऊन २०१९ पासून या पक्षाला ‘बैलगाडी’ हे चिन्ह पुन्हा देण्यात आले.

पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचे चिन्हही गोठवले
लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनानंतर 2021 साली पक्षावर पासवान यांचा मुलगा चिराग तर भाऊ कुमार पारस यांनी दावा केला होता. अखेर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेला आणि त्यांनी लोकजनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्ह बंगला हे चिन्ह गोठवले. तसेच, कुमार पारस यांना राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आणि त्यांना चिन्ह दिले शिलाई मशीन तर पासवान यांचा मुलगा चिराग पासनाव याला लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) हे नवे नाव देत त्यांना हेलिकॉप्टर हे निवडणूक चिन्ह दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -