घरमहाराष्ट्रशिंदे गट नको, शिवसेनाच म्हणा; ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक

शिंदे गट नको, शिवसेनाच म्हणा; ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक

Subscribe

ठाणे – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन फूट पडले. यामुळे शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) असे दोन गट तयार झाले. आमचीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला. अखेर निवडणूक आयोगाने (Election Commission) खऱ्या शिवसेनेचा पेच संपुष्टात आणून शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे यापुढे शिंदे गट असं न संबोधता आम्हाला शिवसेना म्हणा अशी विनंती करणारे पत्रच जाहीर करण्यात आले आहे. ही खास विनंती माध्यमांना देण्यात आली आहे.

हेही वाचा विधिमंडळाबाहेरून विधानसभा अध्यक्ष अपात्र करण्याचे अधिकार आहेत का?- कपिल सिब्बल

- Advertisement -

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षात दोन गट पडले. त्यामुळे पक्षावर दावा करण्याकरता दोन्ही गट आघाडीवर होते. आम्हीच मूळ पक्ष आहोत असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं. तर, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असं म्हणत शिंदे गटानेही शिवसेना पक्षावर दावा केला. त्यामुळे हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या दरबारी गेलं. ऑगस्ट महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण प्रलंबित होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. परंतु, ही स्थगितीही कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने उठवली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरू झाली. सर्वांची बाजू ऐकून झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल केव्हा येणार याची प्रतीक्षा असतानाच निवडणूक आयोगाने निकालाचा बॉम्ब फोडला. १७ फेब्रुवारीला सायंकाळी निवडणूक आयोगाने राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. त्यानुसार शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. सर्वाधिक आमदार आणि खासदार शिंदे गटाकडे असल्याने खरी शिवसेना शिंदे गट असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला.

हेही वाचा – आमदार-खासदार खरेदी करण्याचं रेटकार्ड ठरलंय; संजय राऊतांचा नवा आरोप

- Advertisement -

पक्षातील फुटीनंतर कोणत्या गटाला काय नाव द्यायचं हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता. त्यामुळे सामान्य माणसांसहित, प्रसारमाध्यमांनी दोन्ही गटांना ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी केली. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही ठाकरे गट आणि शिंदे गट असं संबोधलं जात आहे. त्यामुळे ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं असून आम्हाला शिंदे गट न संबोधता शिवसेना म्हणा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -