घरताज्या घडामोडीफेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होणार, हवामान विभागाचा इशारा

फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होणार, हवामान विभागाचा इशारा

Subscribe

दिल्लीसह संपूर्ण देशभरात फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीप्रमाणेच मार्च महिनाही उष्ण असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यंदाच्या वेळेस उन्हाळ्याला लवकर सुरूवात झाली आहे. पर्वतांमध्ये कमी बर्फवृष्टीमुळे होत असल्यामुळे उन्हाच्या झळा वाढत आहेत.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगरावरून येणारे थंड वारेही थांबले आहेत. मात्र, उत्तर भारतात पडणाऱ्या या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा दिल्लीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तर नैऋत्येकडून गरम हवा सतत येत असते. ज्यामध्ये उष्णता वाढत आहे.

- Advertisement -

यावेळी पश्चिमेकडून वारे वाहण्यास विलंब होत असल्याचे महेश पलावत यांनी सांगितले आहे. यावेळी जर डोंगरावर बर्फवृष्टी झाली असती तर उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरण थंड झाले असते. मात्र सध्या तरी उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही.

मार्च महिनाही खूप उष्ण असणार असून उन्हाच्या झळा वाढणार आहेत. या सततच्या वाढत्या उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होणार असल्याचे पलावत यांनी सांगितले. विशेषत: मोहरी आणि गहू पिकांचे उत्पन्न घटण्याचा धोका आहे. पलावत म्हणाले की, निश्चितपणे काहीही सांगणे कठीण आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीवरून असे दिसते की, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने सामान्यपेक्षा जास्त उष्ण असतील.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांच्या सुरात भाजप नेत्याचा सूर; त्यानेही केली ‘तीच’ मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -