घरमनोरंजनजावेद अख्तरचं वक्तव्य पाकिस्तानला झोंबलं, दिलं असं उत्तर की....

जावेद अख्तरचं वक्तव्य पाकिस्तानला झोंबलं, दिलं असं उत्तर की….

Subscribe

पाकिस्तानबद्दल दिलेल्या वक्तव्यावर तिथल्या पाकिस्तानी लोकांनी टाळ्या वाजवणं सुद्धा तिथल्या कलाकारांना पसंत पडलेलं नाही.

जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानला गेले. यावेळी त्यांनी २००८ च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप पाकिस्तानवर केलाय आणि पाकिस्तानने आपली परिस्थिती सुधारली नाही तर त्यांना आणखी वाईट दिवस येऊ शकतात, असा गोड शब्दात इशाराही दिला.

जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य पाकिस्तानी कलाकारांना बरंच झोंबलं असं चित्र दिसतंय. जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानी कलाकारांनी जोरदार फटकारलं आहे. यामध्ये सबूर अली, शान शाहिद सारख्या कलाकारांचा समावेश आहे. जावेद अख्तर यांच्यावर अनेकांनी निवडक टीका केली. तसंच पाकिस्तानबद्दल दिलेल्या वक्तव्यावर तिथल्या पाकिस्तानी लोकांनी टाळ्या वाजवणं सुद्धा तिथल्या कलाकारांना पसंत पडलेलं नाही. जावेद अख्तर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी अभिनेता-निर्माता एजाज अस्लम यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “जावेद अख्तर यांच्या मनात इतका द्वेष असेल तर त्यांनी इथे यायला नको होतं. त्यानंतरही आम्ही त्यांना येथून सुखरूप जाऊ दिलं. तुमच्या या सगळ्या खोडसाळ वक्तव्याला हे उत्तर आहे.”

- Advertisement -

यावर आता जावेद अख्तर यांनीही सडेतोड उत्तर दिलंय. “आम्ही मैत्रीसाठी गेलो होतो, पण याचा अर्थ असा नाही की थोडं खोटं बोलायला लागेल. आम्हाला तुमचा देश तर खूप आवडतो. नाती खोट्यावर नसून सत्यावर बांधली जातात. आम्ही आमचे सत्य देखील स्वीकारतो. बरं, हा विषय खूप गोंधळलेला आहे. कदाचित भविष्यात दोन्ही देशांमध्ये यावर चर्चा होईल.” यापुढे बोलताना जावेद अख्तर यांनी सांगितले की, “पाकिस्तानमधील फैज महोत्सवादरम्यान त्यांना खूप प्रेम मिळाले. लोक भारताबद्दल खूप प्रश्न विचारत होते. तो एक मोठा हॉल होता, जो ३००० लोकांनी खचाखच भरलेला होता. वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते.”

यापुढे बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, एका लेखिकेने त्यांना विचारले, आम्हाला तुम्ही खूप आवडता, भारत देश सुद्धा खूप आम्हाला खूप आवडतो. पण तुम्हाला आम्ही सगळेच दहशतवादी आहोत असं का वाटतं. आमच्या विरोधात इतका द्वेष का आहे? मग मला ग्राउंड रिअॅलिटी सांगावी लागली. मी म्हणालो की, तुमच्या कलाकाराचा आदर करतो. मुंबई दहशतवादी हल्ल्यावरील माझ्या भाषणानंतर सर्वात आश्चर्याची गोष्ट होती जेव्हा तिथे उपस्थित असलेले पाकिस्तानी लोकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -