घरताज्या घडामोडीप्रवाशांसाठी रेल्वेचे 'डिजिटल लॉक सिस्टम'; सामान राहणार सुरक्षित

प्रवाशांसाठी रेल्वेचे ‘डिजिटल लॉक सिस्टम’; सामान राहणार सुरक्षित

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना आपल्या सामानाची काळजी असते. कारण बऱ्याच प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा या चोरीच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी भारतीय रेल्वेने OTP आधारित 'डिजिटल लॉक सिस्टम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना आपल्या सामानाची काळजी असते. कारण बऱ्याच प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा या चोरीच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी भारतीय रेल्वेने OTP आधारित ‘डिजिटल लॉक सिस्टम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांधून प्रवास करताना प्रवाशांचे सामान सुरक्षित राहणार आहे. (Digital Lock System Luggage In Train Not Be Stolen And Train Door Not Open Without Otp)

मालवाहतूक आणि पार्सल गाड्यांमधील मालाची वाहतूक करताना मालाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय रेल्वे ‘वन टाइम पासवर्ड’ (OTP) तंत्रज्ञानावर आधारित नवीन ‘डिजिटल लॉक’ सिस्टम सुरू करणार आहे. ही प्रणाली वस्तू आणि पार्सलसाठी वाढीव सुरक्षा प्रदान करणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीदरम्यान चोरीच्या घटना कमी होणार आहे.

- Advertisement -

अशी असेल सिस्टम

  • ट्रकच्या धरतीवरच वस्तू आणि पार्सल घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये जीपीएस-सक्षम ‘स्मार्ट लॉक’ बसवले जाणार आहेत.
  • जीपीएस प्रणालीद्वारे वाहनाचे लोकेशन ट्रेस करता येईल, त्यामुळे चोरीची शक्यता कमी होईल.
  • नवीन प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ओटीपीवर आधारित असणार आहे.
  • ज्याचा वापर ट्रेनच्या डब्याचे दरवाजे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी केला जाईल.
  • प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात प्रवेश करणे शक्य होणार नाही कारण डब्बा ओटीपीद्वारे उघडला जाईल आणि नंतर दुसर्‍या ओटीपीने लॉक केला जाईल.
  • डबे सील केले जातील आणि छेडछाड रोखण्यासाठी प्रत्येक स्थानकावर सील लावून निरीक्षण केले जाईल.
  • उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर ताबडतोब अलर्ट मेसेज पाठवला जाईल.
  • लोडिंग किंवा अनलोडिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्याला ओटीपी दिला जाईल.

योग्य दरात ही सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या शोधात भारतीय रेल्वे

- Advertisement -

सद्यस्थितीत योग्य दरात ही सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या शोधात भारतीय रेल्वे आहे. ओटीपीवर आधारित नवीन ‘डिजिटल लॉक’ प्रणाली, जी मालगाड्या आणि पॅकेज ट्रेनमध्ये स्थापित केली जाईल. वाहतुकीदरम्यान मालाची सुरक्षा वाढवेल. या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे एक सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक उद्योगातील चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे.


हेही वाचा – ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढणार, मशाल चिन्हावरून समता पक्षाची SC मध्ये धाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -