घरक्रीडाभारतीय संघाच्या स्टार वेगवान गोलंदाजावर दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून परतला घरी

भारतीय संघाच्या स्टार वेगवान गोलंदाजावर दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून परतला घरी

Subscribe

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे वय 74 होते. त्यांनी काल बुधवारी सायंकाळी जवळपास 6.30 वाजता अखेरचा श्वास घेतला.

उमेश यादव याचे वडील मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच घरी आणले गेले होते. अशातच त्यांच्या निधनामुळे उमेश यादव आणि त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

उमेश यादवचे वडील तिलक यादव हे तरुणपणी प्रसिद्ध कुस्तीपटू होते. ते उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोकरभिंडा गावचा रहिवासी होते. वेस्टर्न कोल फिल्डमध्ये नोकरीच्या निमित्ताने ते नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे कुटुंबासह राहत होते. तिलक यादव यांनी त्यांच्या मागे मोठा परिवार सोडला आहे. तिलक यादव यांना तीन मुलं कमलेश, क्रिकेटर उमेश, रमेश आणि एक मुलगी आहे. नागपूर जिल्ह्यातील कोलार नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

उमेश यादव सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग आहे. पण त्याला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि132 धावांनी विजय मिळवला. तसेच उमेशने भारतीय संघाकडून आतापर्यंत 54 कसोटी सामने, 75 वनडे सामने आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -