घरमहाराष्ट्रपुणेदुबईहून मतदारांना बोलावलं तर वावगं काय; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

दुबईहून मतदारांना बोलावलं तर वावगं काय; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जाहिर केले. या निर्णयानंतर आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यातील काही उमेदवार शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांंशी संवाद साधला. 

पुणेः मतदार दुबईला गेला असेल किंवा काठमांडूला गेला असेल तर त्याला मतदानासाठी बोलावलं तर त्यात वावग काही नाही. असे भाष्य केले म्हणून टार्गेट करणे म्हणजे त्याला धार्मिक रंग देण्यासारखे आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जाहिर केले. या निर्णयानंतर आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यातील काही उमेदवार शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांंशी संवाद साधला.

- Advertisement -

उस्मान हिरोले यांनी एक सभेत दुबई येथून मतदारांना परत बोलण्याचे आवाहन शरद पवार यांना केले होते. त्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, जर ते मतदार नसते तर त्यावर आक्षेप घेणे ठिक होते. पण त्यांनी मतदारांना बोलवण्याचे आव्हान केले आहे. मतदारांना मतदानासाठी बोलणे चुकीचे असू शकत नाही.

कसबा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उतरले आहेत. त्यावर पवार म्हणाले, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्थ कारण सुरु आहे. ते याआधी कधी झाले नाही. कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकायचीच या हेतूनेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी उतरले आहेत.

- Advertisement -

शरद पवार यांना भाजप पक्ष आवडतो. मात्र फडणवीस आवडत नाहीत या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, हा बालीशपणा आहे. पोरकटपणा आहे. एवढी वर्षे मी भाजपवाल्यांना बघतो आहे. असे वक्तव्य त्यांनी कधी केलेले नाही. जनतेचे प्रश्न सोडवता येत नाही. त्यामुळे कुठे तरी विषय भरकटण्यासाठी हे सर्व सुरु आहे.

निवडणुकीची शक्यता नाही
सध्या तरी निवडणुका लागतील अशी शक्यता नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची शक्यता वर्तवली आहे. त्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -