घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023भर सभागृहात मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना शाब्दिक चिमटा; म्हणाले, आम्ही सढळ हस्ते मदत...

भर सभागृहात मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना शाब्दिक चिमटा; म्हणाले, आम्ही सढळ हस्ते मदत करतो!

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023-24 | यावरूनच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात अजित पवारांना टोला लगावत हे सरकार दोन्ही हाताने देणारे सरकार आहे, घेणारे नाही. तसंच, आम्ही फक्त बोलत नाही तर देतोही, असं म्हणत त्यांनी अजितदादांना चिमटा काढला.

Maharashtra Assembly Budget 2023-24 | मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडांजगी पाहायला मिळत आहे. शेतीपिके, उत्पादन, नुकसानभरपाईच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. यावरूनच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात अजित पवारांना टोला लगावत हे सरकार दोन्ही हाताने देणारे सरकार आहे, घेणारे नाही. तसंच, आम्ही फक्त बोलत नाही तर देतोही, असं म्हणत त्यांनी अजितदादांना चिमटा काढला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री होते. त्यावेळी अजित पवार आमदारांना निधी देत नसत. आमदार निधींचं असमान वाटप होत असल्याच्या टीकाही अनेकवेळा झाल्या. यावरूनच, एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात त्यांना शाब्दिक चिमटा काढला. तसंच, छगन भुजबळ यांचं नाव घेत तेव्हा काय होत होतं हे तुम्हाला माहितेय, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आतापर्यंत फक्त घोषणा होत होत्या, परंतु देण्याचं काम युतीच्या सरकारने केलंय, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा…तर हक्कभंग आणावा, कांदा प्रश्नावरून सभागृहात गोंधळ झाल्यानंतर फडणवीसांचे आव्हान

दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ, नियमित देण्यात येणारी नुकसनाभरपाईची रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. ते म्हणाले की, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून ७५५ कोटींचं वाटप झालं. यासाठी अतिरिक्त ३३०० कोटींची मागणी आली आहे. या मागणीची वैधता तपासून कार्यवाही केली जाणार आहे. तसंच, नियमितपणे देण्यात येणारे नुकसानभरपाईपोटी ६८०० कोटींपैकी सहा कोटींचं वाटप झालं आहे. ८०० कोटींचं वाटप राहिलं आहे. तर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासही सुरुवात झाली असून एकाच दिवशी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना एका क्लिकवर अडीच हजार कोटी कॅबिनेटमधून देण्यात आले आहेत, असी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

सततच्या पावसामुळे होणारे नुकसान, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभ आणि इतर नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज लक्षवेधी मांडली. तसंच, ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार याची तारीख जाहीर करावी अशी विनंतीही अजित पवारांनी केली होती. ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा होईल, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

हेही वाचा – शिंदे गटात जाण्यासाठी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर तळ ठोकण्याची भास्कर जाधवांची होती तयारी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -