घरपालघरडहाणू तालुक्यात रुग्णवाहिकेमध्ये महिलेची प्रसूती

डहाणू तालुक्यात रुग्णवाहिकेमध्ये महिलेची प्रसूती

Subscribe

शासनाच्या नव्या धोरणानुसार महिलेच्या गरोदरपणा ते प्रसूती दरम्यान गरोदर महिलेची काळजी घेण्यासाठी शासनाने गावागावात आशा कार्यकर्त्या नेमल्या आहेत.

डहाणू : डहाणूतील एका महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेत करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रूग्ण वहिकेतून रुग्णालयाकडे जात असताना रस्त्यातच असह्य प्रसूती वेदना होत असल्यामुळे सोबत असलेल्या डॉक्टर आणि आशा कार्यकर्त्या महिला यांनी महिलेची प्रसूती रुग्ण वाहिकेतच केल्याची माहिती मिळाली आहे.  डहाणू तालुक्यातील करंजविरा येथील 25 वर्षीय बेबी शिवा धनगर वय -25 या गरोदर महिलेला अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या होत्या. त्यांनी त्वरित गावातील आशा कार्यकर्त्या सुनंदा कोम यांना याची माहिती दिली असता त्यांनी त्वरित 108 रुग्ण वाहिकेला फोन करून बोलावून घेतले. रुग्ण वाहिकेतून रुग्णालयाकडे जात असताना रस्त्यातच महिलेला असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे रुग्ण वाहिकेसोबत असलेले डॉ. विजयकुमार कोष्टी यांनी चालक वासुदेव वाघ यांना रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबवायला सांगून आशा कार्यकर्त्या आणि महिलेसोबत आलेल्या महिलांच्या मदतीने रुग्ण वाहिकेतच यशस्वीरीत्या महिलेची प्रसूती केली. यानंतर महिलेला नजीकच्या वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याची माहिती वेदांत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
शासनाच्या नव्या धोरणानुसार महिलेच्या गरोदरपणा ते प्रसूती दरम्यान गरोदर महिलेची काळजी घेण्यासाठी शासनाने गावागावात आशा कार्यकर्त्या नेमल्या आहेत. याच आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने महिलांना गरोदरपणात आणि प्रसूती काळात चांगली मदत मिळत असल्याचे हे ताजे उदाहरण आहे. महिलेची प्रसूती जोखमीची असल्यामुळे काही वेळा प्रसूती दरम्यान बाळ किंवा माता यांना इजा पोचण्याच्या घटना काही वेळा समोर येतात मात्र, आशा कार्यकर्त्या मुळे अनेक माता व बालकांचे जीव वाचल्याच्यी उदाहरणे आहेत.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रुग्ण वाहिका उपलब्ध होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2023 या काळात या रुग्ण वाहिकेमुळे 5108 गरोदर मातांना सेवा मिळाल्याची माहिती योजनेच्या सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांनी दिली आहे. तसेच कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 108 या नंबरवर फोन करून मोफत आरोग्य सुविधा व रुग्ण वहिका मिळवा असे आवाहन त्यांनी केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -