घरदेश-विदेशबांगलादेशच्या चित्तगाँग ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू ३० जखमी

बांगलादेशच्या चित्तगाँग ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू ३० जखमी

Subscribe

नवी दिल्ली : बांगलादेशातील चितगाँग शहरातील सीताकुंड उपजिल्हामधील कदम रसूल (केशबपूर) भागात काल, शनिवारी दुपारी ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार झाले असून 30 हून अधिक जखमी झाले आहेत. ऑक्सिजन प्रकल्पात स्फोटाचा प्रभाव इतका होता की दोन चौरस किलोमीटरच्या परिघात इमारतींना हादरा बसला आणि प्रकल्पातील विविध वस्तू प्रकल्पापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ऑक्सिजन प्रकल्पातील स्फोट इतका भीषण होता की प्रकल्पातमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर स्फोटापासून एक किलोमीटर अंतरावर कदम रसूल बाजार येथे आपल्या दुकानात बसलेल्या ६५ वर्षीय शमशुल आलम यांच्या अंगावर धातूची वस्तू पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर सुमारे 250-300 किलो वजनाची धातूची वस्तू त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे आलमचा भाऊ मौलाना ओबेदुल मुस्तफा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

- Advertisement -

मदमबीर हाटमधील रहिवासी रदवानुल हक यांनी सांगितले की, ऑक्सीजन प्रकल्पातील स्फोटानंतर कदमरसुल परिसरातून धुराचे लोट उठताना दिसले आणि प्रकल्पामधून 12 कामगारांना बाहेर काढताना पाहिले. तसेच जवळच्या तयार कपड्यांच्या कारखान्यातील एका कामगाराने सांगितले की, त्याने कारखान्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्याचा आवाज ऐकला. काचेचा तुकडा त्याच्या अंगावर पडल्याने त्यांना दुखापत झाली.

दुपारी साडेचारच्या आसपास ऑक्सिजन प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सीताकुंडा आणि कुमिरा अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना एक तासापेक्षा अधिकचा वेळ लागल्याचे कुमिरा अग्निशमन सेवा केंद्राचे वरिष्ठ अधिकारी सुलतान महमूद यांनी दिली. मात्र, स्फोट कशामुळे झाला हे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अद्याप समजलेले नाही.

- Advertisement -

२५ जण चित्तगाँग महिविद्यालयात दाखल
पोलीस चौकीचे प्रभारी नुरुल आलम आशक यांनी सांगितले की, स्फोटात जखमी झालेल्या सुमारे 25 जणांना चित्तगाँग मेडिकल महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख अद्याप पोलिसांना पटलेली नाही. गेल्या वर्षी 4 जून रोजी बीएम कंटेनर डेपोलाही भीषण आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांसह 51 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 200 हून अधिक जण जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -