घरताज्या घडामोडी'जर मर्द आहात तर...', संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला इशारा

‘जर मर्द आहात तर…’, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला इशारा

Subscribe

ऐन होळीच्या सणाला शिवसेना आणि ठाकरे गटात ठाण्यात वाद झाला. ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापसांत भिडले. शिवसेनेने शिवाई नगर शिवसेना शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. यानंतर ठाकरे गटाकडून त्याला विरोध करण्यात आला. घोषणाबाजीही झाली.

ऐन होळीच्या सणाला शिवसेना आणि ठाकरे गटात ठाण्यात वाद झाला. ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापसांत भिडले. शिवसेनेने शिवाई नगर शिवसेना शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. यानंतर ठाकरे गटाकडून त्याला विरोध करण्यात आला. घोषणाबाजीही झाली. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला. ‘जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा. बघून घेऊ’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी इशारा दिला.

“ज्याप्रकारे पोलीस, सत्तेचा वापर करून जे काही ओरबाडून नेलं जात आहे, ते सगळं आम्ही परत मिळवू. हे फक्त काही दिवसांसाठी आहे. ना ही सत्ता राहील, ना ही दादागिरी राहील. पोलीस आमच्या लोकांविरोधात सत्तेचा वापर करत आहेत. याचा अर्थ तुम्ही लोक घाबरला आहात. जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा. बघून घेऊ. हे काही ठिकाणी ठाण्यातच चाललंय. या गटाचं अस्तित्व ठाण्यातच आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांचं काम नाही. मर्द असाल तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका. खेडच्या सभेनंतर सगळ्यांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या आहेत. कसब्यातला विजय, चिंचवड – भाजपाचा विजय नाही. हे सगळं पाहिल्यावर भाजपा किंवा मिंधे गट दुसरं काय करणार? पण आमचा शिवसैनिक मागे हटणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“मी त्यांना सांगतो, ठाण्यात जे चाललंय, ते थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपा तुमचा वापर करतोय, हे तुम्हाला भविष्यात कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. पोलिसांचा वापर करून जर तुम्ही शिवसैनिकांना ताब्यात घेत असाल, तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारं नाही. कोणत्याही रंगाची कुणावर मक्तेदारी नसते. पण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवलं आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून शिंदे गटानं शिवसेनेच्या शाखांवर दावा सांगायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -