घरक्रीडापंतप्रधान मोदींकडून सानियाचं कौतुक, पत्र शेअर करत म्हणाली…

पंतप्रधान मोदींकडून सानियाचं कौतुक, पत्र शेअर करत म्हणाली…

Subscribe

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसला अलविदा केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाला पत्र लिहित तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झासाठी अभिनंदनाचे पत्र लिहिले आहे. त्यानंतर सानियाने देखील नरेंद्र मोदींचे पत्र शेअर करत मी अशा प्रेरणादायी शब्दांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानू इच्छिते, असं म्हटलं आहे.

पंतप्रधान काय म्हणाले?

- Advertisement -

सानियाने भारतीय खेळांवर अमिट छाप सोडली आहे, जी खेळाडूंना पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. टेनिसप्रेमींना हे समजून घेणे कठीण जाणार आहे, की आतापासून तुम्ही व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळणार नाही. तुमच्या माध्यमातून जगाला भारताच्या क्रीडा पराक्रमाची झलक दिसली, असं नरेंद्र मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

तुम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा भारतातील टेनिसची परिस्थिती खूप वेगळी होती. टेनिस या खेळात अधिकाधिक महिला येऊ शकतात आणि सहभागी होऊन त्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे तुम्ही दाखवून दिले आहे, असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, मोदींनी पत्र लिहिल्यानंतर सानियाने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मी अशा प्रेरणादायी शब्दांसाठी नरेंद्र मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या क्षमतेनुसार माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि भारताला अभिमान वाटावा असे मी जे काही करू शकते ते करत राहीन. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार, असं सानिया मिर्झानं म्हटलं आहे.

आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकणाऱ्या सानिया मिर्झाने गेल्या महिन्यात दुबईत शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्यानंतर टेनिसला अलविदा केला होता. परंतु मोदींनी लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावर चाहतेदेखील विविध प्रतिक्रिया देत आहेत.


हेही वाचा : शाकीब हसन संतापला अन् रागाच्या भरात केलं असं काही…व्हिडीओ व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -