घरदेश-विदेशमाझ्या पतीनेच केली सतीश कौशिकची हत्या.. महिलेच्या दाव्याने खळबळ

माझ्या पतीनेच केली सतीश कौशिकची हत्या.. महिलेच्या दाव्याने खळबळ

Subscribe

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूप्रकरणी एका नव्या दाव्याने सर्वांनाच गोंधळात पाडले आहे. दिल्लीतील एका व्यावसायिकाची पत्नी असणाऱ्या महिलेने दावा केला आहे की, तिच्या पतीने दुबईमध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने कौशिककडून घेतलेल्या १५ कोटी रुपयांसाठी कौशिकची हत्या करण्यात आली आहे.

दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने हा दावा केला आहे की, कौशिक माझ्या पतीकडे पैसे परत मागत होते, परंतु माझा पती पैसे देऊ इच्छित नव्हता. त्यामुळेच कौशिक यांची हत्या माझ्या पतीनेच औषध देऊन केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

- Advertisement -

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा
आज एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतील फार्महाऊसमधून काही औषधे जप्त करण्यात आली आहेत. या फॉर्महाऊसमध्ये 66 वर्षीय कौशिक मृत्यूपूर्वी एका पार्टीत सहभागी झाले होते. यानंतर त्यांचा विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत पाहिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितेल की, या महिलेशी आमचे बोलणे झाले आहे. तिने पूर्वनियोजित हत्या असल्याचे आम्हाला सांगितले आहे.

माझ्या पतीने कौशिक यांच्याशी ओळख करून दिली
महिलेने दावा केला की, तिने 13 मार्च 2019 रोजी व्यावसायिकाशी लग्न केले होते. कौशिक यांच्याशी तिच्या पतीनेच ओळख करून दिली होती. यानंतर मी कौशिक यांना भारतात आणि दुबईमध्ये नियमित भेटत होते. तिने दावा केला की, 23 ऑगस्ट 2022 रोजी कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते आणि त्यावेळी त्यांनी तिच्या पतीकडून 15 कोटी रुपयांची मागणी केली होती.

- Advertisement -

माझा पती आणि कौशिक यांच्यामध्ये पैशांवरून वाद 
तक्रारीत महिलेने सांगितले की, कौशिक यांनी माझ्या पतीला गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये देऊन तीन वर्षे झाली होती. तिने पुढे सांगितले की, मी ड्रॉईंग रूममध्ये हजर होते तेव्हा कौशिक आणि माझे पती दोघेही पैशांवरून वाद घालत होते. कौशिक सांगत होते की, मला पैशांची नितांत गरज आहे. कौशिक यांनी दिलेल्या पैशांत माझ्या पतीने कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्यांचे पैसे परत न करत त्यांची फसवणूक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -