घरठाणेकाळजी घ्या; ठाण्यात कोरोना विषाणूचे थैमान, रुग्णांची संख्या ५८ पार

काळजी घ्या; ठाण्यात कोरोना विषाणूचे थैमान, रुग्णांची संख्या ५८ पार

Subscribe

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसू लागले आहे. त्यातच शनिवारी (११ मार्च) एकदम कोरोनाच्या १६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. विशेषतः ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात त्यापैकी ११ रुग्ण असल्याचे दिसत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सक्रिय रुग्णांचा आकडा हा ५८ वर पोहोचला आहे.

ठामपामध्ये नोंदवलेल्या ११ रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या २७ इतकी झाली आहे. तर नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण सापडले आहेत. सक्रिय रुग्णांची नवी मुंबईमधील संख्या १० तर ठाणे ग्रामीणची ८ झाली आहे. मीरा भाईंदर मध्ये एक रुग्ण नोंदवला गेला असून तोच एक सक्रिय रुग्ण आहे.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवलीत शनिवारी रुग्ण आढळून आला नसला तरी तेथील सक्रिय रुग्णांची संख्या ही ४ आहे. उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव बदलापूर या ठिकाणी आज एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. पण, उल्हासनगर -२, भिवंडी -६ सक्रिय रुग्ण आहेत. कुळगाव बदलापूरला सक्रिय रुग्ण नसल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.

पहिली आणि दुसरी लाटही मार्च आणि एप्रिल मध्येच आली होती. त्याचदरम्यान कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली होती. त्यातच बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी आता पाठ फिरवली आहे. तसेच सध्याचे वातावरण रुग्ण वाढीस पूरक असल्याचे दिसत आहे. परंतु नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र शासकीय नियमावलीनुसार तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुवावे या त्रिसूत्री धोरण नागरिकांनी अंगिकरण करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -