घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023करताना काही वाटलं नाही का? शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शंभूराज देसाई संतापले

करताना काही वाटलं नाही का? शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शंभूराज देसाई संतापले

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | आज याप्रश्नी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न मांडला. याप्रकरणी लवकरात लवकर व्हिडीओची तपासणी व्हावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ व्हायरल (Viral Video) करण्यात आला. याप्रकरणी कालही सभागृहात महिला आमदारांनी लक्षवेधी मांडली. अशापद्धतीने व्हिडीओ व्हायरल करून संसार उद्ध्वस्त केले गेले तर राजकारणात महिला येणार नाहीत, असं महिला आमदारांनी सांगितलं. दरम्यान, आजही याप्रश्नी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न मांडला. याप्रकरणी लवकरात लवकर व्हिडीओची तपासणी व्हावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

म्हात्रे आणि सुर्वे प्रकरणात एसआयटी लावलेली आहे. याबाबत कामकाज लवकर सुरू होईल अशी अपेक्षा. पण या प्रकरणात कालपासून १४ पोरांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडीओ ओरिजिनल आहे की मॉर्फ आहे याचा निर्णय तर येऊद्या. त्या पोरांच्या घरी रात्री २ वाजता जाऊन पोलीस पोरांना घेऊन येत आहेत. त्या पोरांची चुकी काय हे तर पोरांना कळूद्यात. आपण संवेदनशील होऊन याला उत्तर तरी द्या. तरुण पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात मांडलं.

- Advertisement -

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांची तक्रार आल्यानंतर पोलीस कारवाई करत आहेत. ही बाब गंभीर आहे. शीतल म्हात्रे माध्यमांशी बोलताना रडत रडत थांबल्या आणि निघून गेल्या. रात्री दोन वाजता पोरांना उचललं, हे मान्य आहे. पण हा तपासाचा भाग आहे. अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का? असा संतप्त सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. पोलीस पोलिसांचं काम करत आहेत. पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणात कोण दोषी आहेत हे तपासातून समोर येईल, असंही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

मागाठाणे येथे शनिवारी आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहिले होते. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागाठाणे विभागात एका जीपमधून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमधला शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या संदर्भातील एका आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली. पण आता याचप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, अनेकांची चौकशी सुरू आहे. तसंच, महाराष्ट्र शासनाने या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे.

हेही वाचा व्हिडीओ प्रकरणात प्रकाश सुर्वेंच्या मुलाने पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -