घरमहाराष्ट्रकिसान सभा मोर्चाच्या शिष्टमंडळाशी दादा भुसे, अतुल सावे करणार चर्चा

किसान सभा मोर्चाच्या शिष्टमंडळाशी दादा भुसे, अतुल सावे करणार चर्चा

Subscribe

मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे हे किसान सभेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती स्वत: दादा भुसे यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी नाशिक येथून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आता कसारा घाट ओलांडून मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे. ज्यामुळे आता राज्य सरकारसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे खूप मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. पण याबाबत आता चर्चा करण्यासाठी मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे हे किसान सभेच्या शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याची माहिती दादा भुसे यांच्याकडून देण्यात आली आहे.

आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी नाशिक येथून शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेने चार दिवसांपूर्वी रवाना झाले आहे. भारतीय किसान सभा मोर्चा आणि माजी आमदार जे. पी. गावित यांच्याकडून या मोर्च्याचे नेतृत्व करण्यात येत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि किसान सभा मोर्च्याच्या शिष्टमंडळाची बैठक होणार होती. परंतु काही कारणास्तव ही बैठक रद्द झाली. ज्यामुळे ही बैठक आज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्च्याच्या ठिकाणी येऊन सर्वांच्या समोर चर्चा करून निर्णय घ्यावेत, अशी भूमिका जे. पी. गावित यांनी मांडली होती. ज्यामुळे आता या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे जाणार आहेत.

- Advertisement -

रविवारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. या चर्चेच्या वेळी मंगळवारी (ता. १४ मार्च) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत दुसरी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या किसान सभेच्या शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारने मोर्च्यात येऊन चर्चा करावी, अशी भूमिका मांडली.

हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी यावे; किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची भूमिका

- Advertisement -

दरम्यान, शेतकऱ्यांच्या एकूण १४ मागण्या असून त्यातील काही मागण्या या राज्य पातळीवरील मागण्या असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आली आहे. पण किसान सभेच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भूमिकेनुसार अतुल सावे आणि दादा भुसे हे खर्डी या ठिकाणी किसान सभेच्या शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -