घरमनोरंजनमराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरा केला जातोय गुढीपाडवा!

मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरा केला जातोय गुढीपाडवा!

Subscribe

मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो आहे. ‘जीवाची होतिया काहिली’ आणि ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकांत गुढीपाडवा साजरा केला जातो आहे.‘जीवाची होतिया काहिली’ या मालिकेत गुढीपाडवा साजरा होतो आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यातले प्रेम फुलू लागले असून गुढीपाडवा सण त्यांनी साजरा केला. रेवती कानडी भाषिक असल्याने त्यांचा म्हणजेच कोकटनूरांच्या घरी त्यांचा उदगी हा सणदेखील साजरा होताना आपल्याला दिसेल. उदगी हा सण कर्नाटकात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.

मराठी मुलगा अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या प्रेम कहाणीमध्ये पुढे काय होईल, ते पाहण्याजोगे आहे शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत गुढीपाडवा साजरा होतो आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बायो आणि तिची आई भारती यांच्या आयुष्यात शुभांकरच्या येण्याने चांगले दिवस आले आहेत. बायोच्या शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहा, ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’, सोम.-शनि., रात्री 8.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

- Advertisement -

त्याव्यतिरिक्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात गुढीपाडवा विशेष भागात सोनी मराठी वाहिनीवरील सगळ्या नायिका एकत्र आल्या आहेत. गुढीपाडव्यानिमित्त हा भाग विशेष असेल आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या या भागात काय धमाल असेल, हे पाहणे मजेशीर असेल. पाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, गुढीपाडवा विशेष.

 

- Advertisement -

हेही वाचा :

रोहित शेट्टी निर्मित ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ मराठी चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -