घरदेश-विदेशदिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदियांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदियांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 5 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Subscribe

Liquor Policy Scam नवी दिल्ली – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवण्यात आली असून 5 एप्रिल पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.

- Advertisement -

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांमागे लागलेले शुक्लकाष्ट काही कमी होण्याचे नाव घेत नाही. दिल्लीतील कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्यात सिसोदियांना फेब्रुवारीमध्ये अटक झाली आहे. त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून आता 5 एप्रिल पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने माजी उपमुख्यमंत्री तथा माजी शिक्षणमंत्री सिसोदिया यांना 5 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -