घरमनोरंजनHappy birthday kangana : 4 नॅशनल अवॉर्ड जिंकणाऱ्या कंगना रनौतवर आहेत 700 खटले

Happy birthday kangana : 4 नॅशनल अवॉर्ड जिंकणाऱ्या कंगना रनौतवर आहेत 700 खटले

Subscribe

आज बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौतचा 36 वा वाढदिवस आहे. 23 मार्च 1987 साली कंगनाचा जम्मू काश्मिरमध्ये जन्म झाला होता. कंगनाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कंगनाने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात कंगनाने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी कंगनाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर हळूहळू अनेक चित्रपटामध्ये उत्तम अभिनय करत बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली. आज कंगना केवळ उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर एक दिग्दर्शिका आणि निर्माती देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने आत्तापर्यंत 4 नॅशनल अवॉर्ड आणि 5 फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले आहेत. शबाना आझमीनंतर 4 नॅशनल अवॉर्ड जिंकणारी कंगना भारतातील एकमेव अभिनेत्री आहे. मात्र, कंगनाने कधीही बॉलिवूडमधील मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम केलं नाही, मर्णिकर्णिका हे कंगनाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. कंगनाने कधीही सलमान खान, शाहरुख आणि आमिर या अभिनेत्यांसोबत काम केले नाही. तिने शाहरुखसोबतचा झीरो आणि सलमानसोबतच्या सुलतान चित्रपटाला नकार दिला होता.

- Advertisement -

कंगनावर एकूण 700 खटले

कंगना अभिनयाव्यतिरिक्त देशातील सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असते. शिवाय कंगना अशी एकमेव अभिनेत्री आहे जिच्या विरोधात देशातील विविध शहरांमध्ये आणि न्यायालयात जवळपास 700 खटले आहेत. याबाबत एकेदिवशी स्वतः कंगनाने ट्वीट करुन सांगितले होते. त्यावेळी ती म्हणाली होती की, “माझ्याविरोधात एकूण 700 केसेस दाखल आहेत, ज्या मला एकट्याने हाताळायच्या आहेत. या प्रकरणाशिवाय आगामी चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत, पण या सर्व गोष्टी एकाच वेळी हाताळण्याची हिंमत माझ्यात नाही. माझे हृदय पुन्हा तुटले आहे.” असं कंगना म्हणाली होती.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Happy birthday kangana : ‘मणिकर्णिका’पासून ‘क्वीन’पर्यंत ‘हे’ आहेत कंगनाचे गाजलेले चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -