घरमनोरंजनप्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या

प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या

Subscribe

प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(26 मार्च) रात्री गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. आकांक्षा दुबे भोजपुरी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या आत्महत्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी आता तिचामृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत.

हॉटेलरुममध्ये गळफास लावून आत्महत्या

23 मार्च रोजी बुद्ध सिटी कॉलनीतील सुमेंद्र हॉटेलच्या एका रुममध्ये ‘लायक’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती आली होती. रविवारी सकाळी 10 वाजता नाटी इमली भागात भोजपुरी चित्रपट ‘लायक’च्या शूटिंगसाठी सेटवरून एका मुलाला आकांक्षाला सेटवर घेऊन येण्याचा फोन आला. त्यानंतर त्या मुलाने आकांक्षाला बोलावण्यासाठी हॉटेलमधील दरवाजा ठोठावला. मात्र, आकांक्षाने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्या मुलाने हॉटेलच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला आणि मास्टर चावीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी आकांक्षा दुबेचा मृतदेह पंख्याला लटकताना दिसला. हॉटेलच्या व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासात सुरु केला.

भोजपुरी चित्रपटांमुळे मिळाली लोकप्रियता

- Advertisement -

आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी भोजपुरी चित्रपटातून पदार्पण केलं. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांत काम केलं आहे. ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की 2’ या चित्रपटांमुळे आकांक्षाला लोकप्रियता मिळाली.


हेही वाचा :

नवाजुद्दीन सिद्दीकीने पूर्व पत्नीवर केला गंभीर आरोप, म्हणाला… ती आधीपासूनच विवाहित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -