Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन थिएटरच्या शिस्तीमुळे विविध माध्यमांत काम करण्यास झाली मदत : अभिनेत्री हिमानी शिवपुरी

थिएटरच्या शिस्तीमुळे विविध माध्यमांत काम करण्यास झाली मदत : अभिनेत्री हिमानी शिवपुरी

Subscribe

जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने हिमानी शिवपुरी यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी रंगभूमीमुळे त्यांच्या आयुष्यात आणि अभिनयात नेमके काय बदल झाले, याबाबतची देखील माहिती दिली.

अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी आजवर गोविंदा, सलमान खान, शाहरूख खान, ह्रतिक रोशन आणि अनेक नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रींसोबत काम केलेले आहे. त्यामुळे क्वचितच कोणी असेल, ज्यांना हिमानी शिवपुरी या माहित नसतील. नुकतेच जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने हिमानी शिवपुरी यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी रंगभूमीमुळे त्यांच्या आयुष्यात आणि अभिनयात नेमके काय बदल झाले, याबाबतची देखील माहिती दिली.

अष्टपैलू अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी आयुष्यात अनेक अनपेक्षित वळणं पाहिली, मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचं रंगभूमीवरील प्रेम कायम राहिलं. त्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थिनी दशेत रंगमंचाच्या मोहात पडल्या आणि अखेरीस नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एनएसडीत प्रवेश घेतला. 1982 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतल्यानंतर, त्यांची महत्त्वपूर्ण कारकीर्द सुरू झाली. त्यांनी आजपर्यंत टेलिव्हिजन, सिनेमा, थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांसारख्या विविध माध्यमांतील अनेक मापदंड पार केले आहेत.

- Advertisement -

झी थिएटरच्या ‘हमिदाबाई की कोठी’ आणि ‘रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट’ या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या हिमानी सांगतात की, “रंगभूमी तुम्हाला एखाद्या व्यक्तिरेखेविषयी अंतर्मुख व्हायला शिकवते आणि व्यापक तालमीद्वारे तुमची कौशल्यं धारदार होत जातात. तुम्हाला ही शिस्त आणि सराव कालांतराने विविध माध्यमांत अधिक चांगलं सादरीकरण करण्यास मदत करतात. टीव्हीवरील मालिका म्हणजेच टेलिप्ले हे थिएटरची व्याख्या अतिशय असामान्य पद्धतीने करत असतात आणि ‘हमिदाबाई की कोठी’ आणि ‘रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट’ मध्ये काम करणं माझ्यासाठी खूप रंजक आहे.”

‘रिश्तों का लाइव्ह टेलिकास्ट’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्या सांगतात की, “मी एका खंबीर आईची भूमिका साकारते आहे आणि ज्या महिलांना गृहीत धरण्यात आले अशा सर्व महिलांना ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटेल. कुटुंबातील सदस्यांमधील जे वास्तविक संवाद घडतात, त्यांचं दर्शन या मालिकेत होईल. विशेषत: अशा वेळी जेव्हा लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्या गॅझेटमध्ये वेळ घालवतात. मूर्त मानवी संबंध अमूल्य असतात. जेव्हा नात्यांना प्रेमाचं खतपाणी मिळतं, तेव्हाच ती बहरतात.” तर ‘हमिदाबाई की कोठी’ बद्दल त्या सांगतात, “कोणत्याही कलाकारासाठी ही एक स्वप्नवत भूमिका ठरते. कारण त्यात हिस्ट्रिऑनिक्सला मोठा वाव आहे. काही महान कलाकारांना जिवंतपणी उपेक्षांचा सामना करावा लागला आणि ते विस्मृतीत गेले याची जाणीव हे नाटक करून देतं.”

- Advertisement -

जेव्हा त्या स्वतःच्या प्रवासाकडे मागे वळून पाहतात, तेव्हा हिमानी यांना अनेक अनपेक्षित वळणं दिसतात. त्या भूतकाळात हरवतात, “मी नव्वदचे दशक सुरू होताना दूरदर्शन मालिका ‘फिर वही तलाश’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला एनएसडी सोडावी लागली आणि तेव्हापासून मी टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांत अभिनय करते आहे. तरीही, रंगभूमी हेच माझं पहिलं प्रेम आहे. रंगभूमी कलाकार असल्याचं समाधान व मिळत असलेलं नाव, प्रसिद्धी आणि पैसा यांची तुलनाच होऊ शकत नाही. मी नेहमीच रंगभूमीशी असलेली नाळ जपण्यासाठी वेळ काढेन.”


हेही वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीने पूर्व पत्नीवर केला गंभीर आरोप, म्हणाला… ती आधीपासूनच विवाहित

- Advertisment -