Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन नवाजुद्दीन सिद्दीकीने पूर्व पत्नीवर केला गंभीर आरोप, म्हणाला... ती आधीपासूनच विवाहित

नवाजुद्दीन सिद्दीकीने पूर्व पत्नीवर केला गंभीर आरोप, म्हणाला… ती आधीपासूनच विवाहित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने नवाजुद्दीनवर अनेक आरोप केले होते, त्या आरोपांना नवाजुद्दीनने प्रत्युत्तरही दिलं होतं. शिवाय त्याने त्याच्या गावी असलेली जमीन आपल्या भावांच्या नावावर केली होती. दरम्यान, आता अशातच त्याने पूर्व पत्नी आलिया आणि आपल्या भावांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याने त्याचा भाऊ शमसुद्दीन आणि पूर्व पत्नी आलिया सिद्दीकी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने शमसुद्दीन आणि पूर्व पत्नी आलिया सिद्दीकी यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. यात त्याने त्याच्यावर लावले जाणारे सर्व खोटे आरोप मागे घेऊन लेखी माफी मागावी, तसेच याप्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीने 100 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी देखील केली आहे. त्याने या याचिकेत म्हटलंय की, 2008 मध्ये त्याने त्याच्या धाकट्या भावाला मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. जो नवाजुद्दीन सिद्दीकीनेच्या अकाउंटची सर्व कामं पाहत होता. नवाजुद्दीनने आयकर रिटर्न, ऑडिटिंग, जीएसटी फाइलिंग यांसारखी सर्व कामे शमसुद्दीनकडे सोडून स्वत: चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्याने त्याचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँकेचा पासवर्ड, ईमेल पत्ता आपल्या भावाला दिले होते.

- Advertisement -

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मते, नोकरीवर ठेवल्यानंतर त्याच्या धाकट्या भावाने अनेकवेळा आपली पैशांची फसवणूक केली आहे. एकदा त्याने फसवणूक करत प्रॉपर्टीही स्वतःच्या नावावर केली होती. या काळात भावाने यारी रोडवर एक फ्लॅट, सेमी कमर्शियल प्रॉपर्टी, दुबईमध्ये प्रॉपर्टी आणि बुधना शहापूर इथं फार्महाऊस खरेदी केलं होतं. तसेच त्याने 14 महागडी वाहनंही घेतली होती.

नवाजुद्दीन सिद्दीकीने पूर्व पत्नी आलियावर देखील गंभीर आरोप केला आहे. नवाजच्या मते, आलिया आधीच विवाहित होती, परंतु तिने हे त्याच्यापासून लपवून ठेवलं होतं. नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि आलियावर 21 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

‘मिसेस कोहली’ म्हटल्यावर अनुष्काने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल; पहा व्हिडीओ

- Advertisment -