घरनवी मुंबईकौशल्य विद्यापीठ राज्यासाठी मोठी उपलब्धी; राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

कौशल्य विद्यापीठ राज्यासाठी मोठी उपलब्धी; राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

Subscribe

भारतामध्ये जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे. तरीही भारतीय उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करीत आहेत. श्रम ब्युरोच्या २०१४ च्या अहवालानुसार रोजगार क्षमतेसाठी आवश्यक कौशल्याच्या अभावामुळे भारतातील औपचारिकपणे कुशल कर्मचार्‍यांचा सध्याचा आकार केवळ २ टक्के आहे. याशिवाय पारंपारिक शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या मोठ्या वर्गाला रोजगार देण्याचे आव्हानही आपल्या सर्वांच्या समोर आहे. यापार्श्वभूमीवर कौशल्य विद्यापीठ राज्यासाठी मोठी उपलब्धी असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

पनवेल: भारतामध्ये जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे. तरीही भारतीय उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करीत आहेत. श्रम ब्युरोच्या २०१४ च्या अहवालानुसार रोजगार क्षमतेसाठी आवश्यक कौशल्याच्या अभावामुळे भारतातील औपचारिकपणे कुशल कर्मचार्‍यांचा सध्याचा आकार केवळ २ टक्के आहे. याशिवाय पारंपारिक शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या मोठ्या वर्गाला रोजगार देण्याचे आव्हानही आपल्या सर्वांच्या समोर आहे. यापार्श्वभूमीवर कौशल्य विद्यापीठ राज्यासाठी मोठी उपलब्धी असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.
राज्यपाल बैस यांच्या हस्ते सोमवारी पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे विधीवत भूमीपूजन झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व नाविन्यपूर्ण उपक्रम मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र पाटील, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ.एन रामास्वामी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते.
तरुणांना कौशल्य प्राप्त करण्यासाठी शिक्षणातील व्यावसायिकीकरणाचे महत्व अधोरेखित करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, समाजातील इतर घटकांना जसे की, स्त्रिया, उपेक्षित लोक, आदिवासी इत्यादींना त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट गरजांनुसार अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची गरज आहे. बहुसंख्य उपेक्षित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी निरक्षरता ही समस्या असू शकते, परंतु महिलांना कौशल्य प्रशिक्षण देताना कौटुंबिक समस्या आणि सामाजिक अडचणींचाही सामना करावा लागतो. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. भारताने उच्च आर्थिक विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. वेग वाढविण्यासाठी, जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार सुसंगत असलेल्या अशा कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कौशल्य प्रशिक्षण सुविधांचा विस्तार हे एकमेव आव्हान नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी कौशल्याचा दर्जा वाढविणे हेदेखील एक आव्हान आहे. ते म्हणाले, कौशल्य विकास आणि उद्योजकता २०१५ वरील राष्ट्रीय धोरण गती, मानकांसह आणि शाश्वत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर कौशल्य प्रदान करण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रस्ताव आहे. कौशल्ये प्रदान करण्यासाठी देशात सुरू असलेल्या सर्व क्रियाकलापांना एक व्यापक फ्रेमवर्क प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. कौशल्ये प्रदान करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्याचा आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणी केंद्रांशी जोडण्याचा प्रयत्न देखील करते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, राज्य गीत आणि विद्यापीठ गीत गायले गेले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांनी केले. उस्थ्थितांचे आभार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्योग आणि सेवा पुरवठा क्षेत्रातील चीनची एकाधिकारशाहीस पर्याय शोधण्यास जगातील सर्वच देश, उद्योजक प्रयत्न करीत आहेत. यात सर्वात जास्त संधी आणि शक्ती केवळ भारताकडे आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौशल्य विकास,मानव संसाधन यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, उद्योगासह सेवा पुरवठाही महत्वाची बाब आहे. त्यानुषंगाने विविध कौशल्य विकासाच्या संधी येणार्‍या काळात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच विक्रमी वेळेत महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल महाराष्ट्र कौशल्य विकास विभागाचे, या विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचार्‍यांचे विशेष कौतुक केले.प्रशिक्षित मानव संसाधन ही आवश्यक बाब आहे आणि याकरिता कौशल्य विकास या विभागाची जबाबदारी खूप मोठी आहे. महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाची वास्तू आदर्शवत अशीच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास या विषयाला खर्‍या अर्थाने चालना दिली. जगातील अमेरिका, इंग्लंड ,चीन यासारख्या देशांनी तेथील लोकसंख्येचा योग्य वापर करून कौशल्य विकास व तंत्रज्ञानाला चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील प्रसन्न विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. महाराष्ट्र राज्य आयटीआय आणि उद्योगाची मोठ्या प्रमाणावर सांगड घालणारे पहिले राज्य ठरले आहे. पुढच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -