घरठाणेमाझ्या मुलीला मिळालेल्या धमकीचा साधा गुन्हा नाेंदवला नाही; जितेंद्र आव्हाड

माझ्या मुलीला मिळालेल्या धमकीचा साधा गुन्हा नाेंदवला नाही; जितेंद्र आव्हाड

Subscribe

 

ठाणेः माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी आली. या धमकीची रेकॉर्डिंग पोलिसांना देण्यात आली. याची तक्रारही नोंदवण्यात आली. तरीही पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला नाही. काहीही कारवाई केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात केला.

- Advertisement -

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ ठाणे येथे महाविकास आघाडीने मोर्चा काढला. या मोर्च्याला आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. या मोर्च्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. या मोर्च्याचे नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी आमदार आव्हाड यांनी मुलील्या मिळालेल्या धमकीची आठवण करुन दिली. मला आणि माझ्या मुलीला धमकी आली. पोलिसांत याची तक्रार दिली. धमकीची रेकॉर्डिंग पोलिसांना दिली. तरीही पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. याचा गुन्हा नोंदवला जात नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.

मी अधिवेशनात प्रत्येक आमदाराला विचारलं की तुमची मुलगी असती तर काय केलं असतं. कोणाकडेच याचे उत्तर नव्हते, असे सांगत एक दिन चिंगारी आग मै बदलेगी. तब तुम्हे यहा बचानेवाला कोई नही होगा, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

- Advertisement -

महेश आहेरची पदवी बोगस आहे. त्याचा तपशील पोलिसांना दिला. तरीही कारवाई होत नाही. माझ्याविरोधात बोलणाऱ्याला कार्यकर्त्यांनी चोप दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेले. न्यायालयातून चौकशीचे आदेश आले. चौकशी म्हणजे काय तर पोलीस तक्रारदाराला घेऊन बसतात. चर्चा करतात. मग ठरवतात की जितेंद्र आव्हाडला कसा अडकवायचा, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

रोशनी शिंदे या बुद्धिमान आहेत. त्यांनी कोणतीही अश्लील पोस्ट लिहिली नव्हती. शिवसेनेचे संस्कार असलेली पोस्ट तिने लिहिली होती. पोस्ट मधून तिने केवळ प्रश्न विचारला. तर तिला मारहाण करण्यात आली. तुमचे हे संस्कार ६७ देशात पोहोचले आहेत, असेही आव्हाड यांनी सांगतिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -