घरमहाराष्ट्ररत्नागिरीतील आरेवारे समुद्रात ५ पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात ५ पर्यटकांचा बुडून मृत्यू

Subscribe

रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनारी पोहायला उतरलेल्या ५ पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. हे सर्व पर्यटक मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी आहेत. हे सगळे पर्यटक गणपतीपुळेला जात होते. आरेवारे समुद्रकिनाऱ्याजवळून जात असताना हे पर्यटक समुद्रात पोहायला उतरले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. सर्व पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात आले आहेत.

स्थानिकांनी हटकले तरी पोहायला गेले

बोरिवलीतील डिसुझा कुटुंबीय हे मुंबईतून गणपतीपुळेला फिरण्यासाठी गेले होते. गणपतीपुळेला जाण्याआधी त्यांनी रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्याला भेट दिली. या ठिकाणी गेल्यानंतर पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. सहा पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात उतरले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना समुद्रात उतरू नका असा सल्ला दिला होता. पोहायला उतरत असणारा भाग सखोल असल्याचं सांगूनही स्थानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून हे पर्यटक समुद्रात उतरले. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही आणि पाचही जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

५ जणांचा मृत्यू तर दोघांना वाचवण्यात यश

केनेथ टिमोथी मास्टर्स ( वय – ५६), मोनिका बेंटो डिसोझा (वय – ४४), सनोमी बेंटो डिसोझा (वय – २२), रेंचर बेंटो डिसोझा (वय – १९), मॅथ्यू बेंटो डिसोझा (वय – १८) या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला असून रिटा डिसोझा (वय – ७०) आणि लिना केनेथ मास्टर्स (वय – ५२) यांना वाचवण्यात यश मिळालं. मृतदेह शोधण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. मात्र सर्व मृतदेह मिळवण्यात यश आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -