घरमनोरंजन'बिहू' ट्विटमुळे ट्रोल झाल्यानंतर, हेमा मालिनींनी मागितली माफी; नेमकं कारण काय?

‘बिहू’ ट्विटमुळे ट्रोल झाल्यानंतर, हेमा मालिनींनी मागितली माफी; नेमकं कारण काय?

Subscribe

बाॅलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री, ड्रीम गर्ल आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी एक ट्वीट केलं होतं. हेमामालिनी यांनी शुक्रवारी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटनंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.

बाॅलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री, ड्रीम गर्ल आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी एक ट्वीट केलं होतं. हेमामालिनी यांनी शुक्रवारी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटनंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. ( Bollywood dream girl After being trolled for Bihu tweet Hema Malini apologizes What is the real reason )

हेमा मालिनी यांचं नेमकं ट्वीट काय?

सध्या आसाममध्ये बिहू हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या सणानिमित्त आसामच्या जनतेला हेमा मालीनी यांनी ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या. पण त्यात त्यांनी एक मोठी चूक केली. त्या ट्वीटचा नेटकऱ्यांनी समाचार घेतला.

- Advertisement -

बिहू हा सण आसाममध्ये साजरा होतो, पण त्यांनी आसामऐवजी बिहार हा शब्द वापरुन बिहू च्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागले. आपली चूक लक्षात आल्यानंतर हेमा मालिनी यांनी ट्वीट करुन माफी मागितली.

हेमा मालिनी यांनी ट्विट करून लिहिले होते की, ‘हा कापणीचा हंगाम आहे. पुथंडू (नवीन वर्ष), बैसाखी (पंजाब), बिहू (बिहार) आणि पोइला बैशाख किंवा नबा वर्षा (बंगाल) हे आज साजरे केले जाणारे काही सण आहेत. तुम्हा सर्वांना सणासुदीचा हा महिना आनंददायी जावो.

- Advertisement -

( हेही वाचा: जाहिरातीत झळकली शाहरुखची लेक; पाहा पहिली झलक )

हेमा मालिनी यांनी जेव्हा त्यांच्या ट्विटवरुन ट्रोल करण्यात आलं, तेव्हा हेमा मालिनी यांना आपली चूक समजली. या प्रकरणावर त्यांनी आणखी एक ट्विट करत माफी मागितली आहे. हेमा मालिनी यांनी लिहिले आहे की, ‘मी चुकून बिहूला बिहारमध्ये साजरा होणारा सण म्हटलं आहे. मला माफ करा! बिहू हा आसामचा सण आहे.

नुकतेच हेमा मालिनी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीने त्यांचा मेट्रो प्रवासाचा अनुभव अप्रतिम असल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी इतर स्टार्सनाही मेट्रोमधून प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -