घरमुंबई...म्हणून उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे सरकार पडले नाही - संजय राऊत

…म्हणून उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे सरकार पडले नाही – संजय राऊत

Subscribe

मुंबई : आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी वज्रुमूठ सभा होणार आहे. यानिमित्ताने माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) आरोप केला आहे. ते म्हणाले की, भाजपाने सरकार पाडण्यासाठी खोक्यांची व्यवस्था करून  आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावाच्या माध्यमातून आमदारांना व एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आधीच फोडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार पडले असे मी अजिबात म्हणत नाही.

छत्रपती संभाजीनगर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा पार पडली होती. या सभेनंतर आता महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज (16 एप्रिल) रोजी नागपूरमध्ये होणार आहे. या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते आज नागपुरातील सभेला हजर राहणार असल्याचे समजते.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, आज नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक अशी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. नागपूरची सभा महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे नागपूरला 4.30 वा. पोहचतील त्याचे प्रमुख भाषण या सभेत होणार आहे. त्याच्याशिवाय नाना पटोले, जयंत पाटील, अजित पवार आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहतील.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजिनामा दिल्यामुळे सरकार पडले असे विरोधक म्हणत असल्याचा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की,  भारतीय जनता पक्षाने सरकार पाडण्यासाठी खोक्यांची व्यवस्था आधीच केली होती. भाजपाने केंद्रीय यंत्रणाचा दबावाच्या माध्यमातून शिवसेनेतील आमदार आणि एकनाथ शिंदेंना आधीच फोडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार पडले असे मी अजिबात म्हणणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवर अजित पवार बोलणार का?
अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या माध्यमातून समोर येत आहेत. यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आज वज्रमूठ सभेत बोलणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडीतील नेते विविध मुद्द्यांवरून या सभेत राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. तसेच ही सभा नागपूरमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात होत असल्यामुळे या सभेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मविआची दुसरी वज्रमूठ सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -