घरनवी मुंबईमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, शाह, शिंदे-फडणवीस व्यासपीठावर उपस्थित

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, शाह, शिंदे-फडणवीस व्यासपीठावर उपस्थित

Subscribe

या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर दाखल झाले आहेत.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघरमध्ये भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर दाखल झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यासाठी श्रीसदस्यांची अफाट गर्दी सोहळ्याच्या ठिकाणी दिसून येतं आहे. बघावं तिकडे श्रीसदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून याची याची देही याची डोळा सोहळा पाहिला आले आहे. महाराष्ट्र राज्य गीताने या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिमा देऊन अमित शाह यांचं स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अमित शाह यांना राष्ट्रध्वज आणि वाघाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर श्री सदस्यांच्या पाच प्रतिनिधींनी देखील अमित शाह यांचं शाल-श्रीफळ देऊन स्वागत केलं. यावेळी श्री सदस्यांकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती अमित शाहांना भेट देण्यात आली. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाजकार्यावर आधारित एक ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. स्वच्छता अभियाने राबवली जातात. मंदिरांचे तलाव, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन असे कार्यक्रम त्यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं आरोग्य क्षेत्रात चांगल काम करण्यात आलं आहे. रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -