घरमनोरंजन'हेराफेरी ३' मधून अक्षय कुमार गायब?

‘हेराफेरी ३’ मधून अक्षय कुमार गायब?

Subscribe

‘हेराफेरी ३’ या बहुप्रतिक्षित सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच लाँच करण्यात आला. हेराफेरी सिनेमाच्या पहिल्या दोन्ही पार्ट्सना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. परेश रावल (बाबूभय्या), सुनील शेट्टी (श्याम) आणि अक्षय कुमार (राजू) यांच्या सिनेमातील तिकडीला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली. त्यामुळे त्यांची धमाल कॉमेडी तिसऱ्यांदा अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असणार यात शंका नाही. मात्र, ‘हेराफेरी ३’च्या फर्स्ट लूकच्या लाँचिंग कार्यक्रमात अक्षय कुमार कुठेच दिसला नाही. या मुद्द्यावरुन सध्या विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेराफेरी मधून ‘राजू’ गायब?

- Advertisement -

हेराफेरी सिनेमातील ३ मुख्य पात्रांपैकी ‘राजू’ हे पात्र साकारणारा अक्षय कुमार, हेराफेरी ३ सिनेमाच्या फर्स्ट लूकच्या लाँचिंगवेळी अनुपस्थित होता. त्यामुळे तिसऱ्या भागात राजू असणार की नाही, यावर सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे. सिनेमाच्या पहिल्या दोन्ही भागात होणाऱ्या ‘हेराफेरीं’मध्ये राजूचा खूप महत्वाचा वाटा होता. बाबूभैय्या आणि श्यामला सतावणाऱ्या आणि हेराफेरी करत धमाल उडवून देणाऱ्या ‘राजू’ला तुफान लोकप्रियता मिळाली. राजू या पात्रामुळे अभिनेता अक्षय कुमारचा ‘कॉमेडी’ जॉनर प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र आता तिसऱ्या भागात राजू अक्षय साकारणारा नसल्याची चर्चा होत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता होणार ‘राजू’चीच हेराफेरी

- Advertisement -

दरम्यान, हेराफेरीच्या तिसऱ्या भागात दोन नव्या कलाकारांची एंट्री झाली आहे. अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम हे दोघं हेराफेरीच्या तिसऱ्या भागात झळकणार आहेत. सिनेमाच्या फर्स्ट लूकचे लाँचिंग पाहतेवेळी आपल्या लक्षात येते, की जॉन आणि अभिषेक हे दोघंही आपणच ‘राजू’ असल्याचा दावा करतात. त्यामुळे राजूला शोधणारे बाबूभय्या (परेश रावल) आणि श्याम (सुनील शेट्टी) चांगलेच गोंधळून जातात. त्यानंतर खरा राजू कोण? यावरुन जॉन आणि अभिषेकमध्ये वादावादी सुरु होते आणि हे भांडण थांबवताना परेश रावल म्हणतात, की ‘पहिल्या भागात तुम्ही पैशांची हेराफेरी पाहिली. दुसऱ्या भागात ड्रग्सची हेराफेरी पाहिलीत. मात्र आता पाहा ‘राजू’ची हेराफेरी”. बाबूभय्यांच्या या डायलॉगमुळे अक्षय सिनेमात असणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अहमद खान आणि नीरज व्होरा दिग्दर्शित ‘हेराफेरी ३’ हा सिनेमा, पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -