घरदेश-विदेशखिलाडी देणार 'रोड सेफ्टी'चे धडे

खिलाडी देणार ‘रोड सेफ्टी’चे धडे

Subscribe

खिलाडी अक्षय कुमारचा हा फोटो बघून तुम्हाला हा कोणत्यातरी सिनेमाचा सीन असल्याचं नक्कीच वाटलं असेल. पण थांबा अजिबात गल्लत करु नका, कारण अक्षयचा हा फोटो कोणत्या सिनेमातला नसून एका जाहिरातीतील आहे. सरकारच्या रोड सेफ्टी ‘ च्या जाहिरातीत अक्षय काम करत असून रस्ते सुरक्षेविषयी यातून तो संदेश देणार आहे. खरंतरं ‘हेड टू टो’ पर्यंत सगळ्याच प्रोडक्टसच्या जाहिरांतीमध्ये सर्रास बॉलीवूड स्टार्स असतात. सिनेमांप्रमाणे जाहिराती बघून लोक तो प्रोडक्ट लक्षात ठेवतात, वापरतात ही सर्वसाधारण धारणा त्या त्या कंपन्यांची असते. लोकांची हीच मानसिकता हेरुन रस्ते सुरक्षेच्या जाहिरातीत अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे.

इन्स्टावर केला फोटो शेअर

- Advertisement -

अनेक सामाजिक कामांमध्ये अक्षयचा पुढाकार असतो. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात मदत असू दे किंवा अनाथ मुलांना मदत, अक्षय नेहमीच काही तरी करत असतो. म्हणूनच त्याचे चाहते त्याला ‘रिअल हिरो  असं म्हणतात. त्याच्या पॅडमॅन या सिनेमातून त्याने महिलांच्या मासिक पाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडच्या निर्मितीची कहाणी सांगितली. अरुणाचलम मुरुगुनाथम या खऱ्या पॅडमॅनची कथा सांगत त्याने पुन्हा एकदा सॅनिटरी पॅडचे महत्त्व आणि इतरांना याविषयी वाटणारी लाज खोडून काढली. आणि पॅडमॅनचे कॅम्पेन चालवत हा विषय लपवण्याचा नसून महिलांसाठी तसेच पुरुषांनीही समजून घेण्याचा आहे हे दाखवून दिलं. आता रोड सेफ्टीचे धडे देत तो ट्राफिक आणि अपघात शून्य प्रवासासाठी सूचना देणार आहे. त्याने या जाहिराती संदर्भातला फोटो ट्विटरवर शेअर करत रस्ते व वाहतूक विभागाचे आभार मानले आहेत.

 

- Advertisement -

केसरीतून दिसणार अक्षय

अक्षय चाहत्यांना ‘केसरी‘ या सिनेमातून दिसणार आहे. हा सिनेमा १८९७ च्या शिखांच्या अफगाणिस्तान सोबतच्या लढाईचा आहे. २१ शीखांनी १० हजार अफगाणी लोकांवर हल्ला चढवला. ही घटना सांगणारा हा सिनेमा आहे. परिणिती चोप्रा या सिनेमात अक्षयची को-स्टार असून हा सिनेमा अनुराग सिंग या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.या सिनेमातील अक्षयने स्वत:चा लूक शेअर केला होता. या लूकमुळे त्याच्या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, हा सिनेमा मार्च २०१९ मध्ये रिलीज होईल, असा म्हटलं जातयं.

या सेलिब्रिटींनीही केले सकारी जाहिरातीतून काम

अमिताभ बच्चन, विद्या बालन, आमीर खान, अनुष्का शर्मा  यांनी वेगवेगळ्या सरकारी जाहिरातीतून काम केले आहे.या सेलिब्रिटींच्या काही जाहिराती

(स्वच्छ भारतच्या जाहिरातीत बीग बी अमिताभ बच्चन)

(‘युनिसेफ’च्या जाहिरातीत विद्या बालन)

(कुपोषित मुक्त भारतच्या जाहिरातीत आमीर खान)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -