घरमहाराष्ट्रबारसुमधील रिफायनरी वादाबाबत निलेश राणेंनी व्यक्त केले मत, म्हणाले...

बारसुमधील रिफायनरी वादाबाबत निलेश राणेंनी व्यक्त केले मत, म्हणाले…

Subscribe

कोणाच्या तरी सांगण्यावरून या प्रकल्पाला विरोध करण्यात येऊ नये, असे मत बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाच्याबाबत निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

कोकणातील नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प तयार करण्यात येऊ नये, असे सांगत नाणार वासियांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. या प्रकल्पाला विरोध करताना नाणार वासियांनी मोठा लढा देखील दिला होता. ज्यानंतर हा रिफायनरी प्रकल्प नाणार येथे न निर्मिती करता बारसू गावात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता या प्रकल्पाला बारसू सोलगावातील नागरिकांकडून सुद्धा तीव्र विरोध करण्यात येत आहे.

बारसू गावातील नागरिकांनी या रिफायनरी प्रकल्पासाठीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलनाला सुरूवात केली आहे. कडाक्याच्या उन्हात आंदोलक आंदोलन करत असल्याने अनेकांच्या प्रकृती खालावल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून या प्रकल्पाला विरोध करण्यात येऊ नये, असे मत निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

- Advertisement -

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “कोकणामध्ये बारसू सोलगावला जी रिफायनरी येऊ पाहते आहे त्यात विरोधक किती आणि समर्थक किती हे समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांचा रिफायनरी परिसराशी काही संबंध नाही आणि त्यातले काहीजण तर मुंबईत राहतात अशी लोकं रिफायनरीला विरोध करत आहेत. सरकार लोकांच्या हिताचा विचार करेलच पण स्थानिक ग्रामस्थांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून विरोध करू नये, सांगणाऱ्यांचा हेतू तपासून बघावा.” असे लिहित त्यांनी या प्रकल्पाला विनाकारण विरोध करणाऱ्यांना टोला लगावला आहे. कारण या आंदोलनात काही मुंबईतील नागरिक देखील सहभागी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

निलेश राणे या ट्वीटच्या आधी देखील आणखी एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्यांनी बारसु सोलगावमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यात यावा, असे उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहिले होते. अशा आशयाचे पत्र लिहिले होते. या पत्राची प्रत देखील निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये जोडली आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात असलेल्या बारसू सोलगावचे नाव रिफायनरी प्रकल्पासाठी सुचवले असल्याचा पुरावा आहे.


हेही वाचा – ‘जो मोदी भक्त असेल त्याला मारले जाईल’; काँग्रेस नेत्याचे प्रक्षोभक विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -