घरदेश-विदेश'जो मोदी भक्त असेल त्याला मारले जाईल'; काँग्रेस नेत्याचे प्रक्षोभक विधान

‘जो मोदी भक्त असेल त्याला मारले जाईल’; काँग्रेस नेत्याचे प्रक्षोभक विधान

Subscribe

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे काँग्रेस नेते उदित राज (Congress leader Udit Raj) पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उदित राज यांनी एक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जो मोदी भक्त असेल त्याला मारले जाईल.” त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

उदित राज हे 2014 मध्ये उत्तर-पश्चिम दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले, पण त्यांना 2019 मध्ये तिकीट नाकारण्यात आले. त्यांचे तिकीट भाजपने गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिल्यानंतर ते विजयी झाले होते. यानंतर उदित राज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून भाजपविरोधातील प्रत्येक आंदोलनाला ते पाठिंबा देत असून प्रक्षोभक विधाने करत आहेत.

- Advertisement -

काँग्रेसने उदित राज यांना नोव्हेंबर 2023 मध्ये ‘ऑल इंडिया असंघटित कामगार आणि कर्मचारी काँग्रेस’चे अध्यक्ष बनवले. मनरेगा कामगारांच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनात त्यांनी नुकतेच प्रक्षोभक विधान केले होते. उत्तर प्रदेश सरकारवर भाष्य करताना त्यांनी असेही म्हटले आहे की, यूपी दंगलमुक्त नाही आणि गुंडामुक्त झाली नाही आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवर उदित राज यांनी यूपी सरकारवर टीका केली आहे. नुकतेच ते हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे पोहोचल्यानंतरही त्यांनी मोदी सरकारविरोधात वक्तव्य केले होते.

- Advertisement -

मनरेगाच्या बजेटमध्ये कपात
नुकत्याच जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात उदित राज त्यांनी ‘मनरेगा कामगार भुकेले, मोदींचे आश्वासन खोटे’ अशा घोषणा दिल्या होत्या. बॅनरवर ‘मनरेगा वाचवा, ग्रामीण भारत वाचवा’ असे लिहिले होते. सरकारने मनरेगाच्या बजेटमध्ये कपात केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. या आंदोलनात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -