घरपालघरपालघर रेल्वे पोलिसांकडून सराईत चोरला अटक

पालघर रेल्वे पोलिसांकडून सराईत चोरला अटक

Subscribe

लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची पाकीटे आणि दागिने चोरी यासोबतच रेल्वे स्टेशन परिसरातील बंद घरांमध्ये देखील तो चोरी करत होता.

बोईसर : पालघर रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत चोरी आणि घरफोडी करणार्‍या सराईत चोरट्यास पालघर रेल्वे पोलिसांनी शिताफीने गजाआड करण्यास यश मिळवले आहे.पालघर रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील वैतरणा ते घोलवड पर्यंतच्या स्टेशन परिसरात चोरी आणि घरफोड्या करणार्‍या रोहीत कान्हा वाघरी या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची पाकीटे आणि दागिने चोरी यासोबतच रेल्वे स्टेशन परिसरातील बंद घरांमध्ये देखील तो चोरी करत होता.

पालघर रेल्वे स्टेशन क्वाटर्स येथे राहणार्‍या तारामती कैलाश यादव वय (६० वर्षे) ही महिला २३ एप्रिल रोजी डहाणू येथील आपल्या मुलीकडे गेली असताना २५ एप्रिल रोजी त्यांच्या बंद घरात शिरून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि इतर सामान घेऊन पोबारा केला होता.या बाबत महिलेने तक्रार दिल्यानंतर पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे कलम ३८० व ४५४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे संशयीत रोहीत वाघरी याला पालघर येथून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

सराईत चोरटा रोहीत वाघरी याच्यावर पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात आतापर्यंत १० गुन्हे दाखल असून पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक विशाल गोळे,राहुल भोईटे,पोलीस शिपाई अजय शेंडगे,अतुल कुटे,शरणबसप्पा धमदे व दिपक डावखर यांनी आरोपीला अटक करण्याची कामगिरी पार पाडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -