घरताज्या घडामोडीसिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार यंदाचा नौसेना दिन, राष्ट्रपती, पंतप्रधान उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार यंदाचा नौसेना दिन, राष्ट्रपती, पंतप्रधान उपस्थित राहणार

Subscribe

यंदाचा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurg Fort) साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्गात 70 लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत.

यंदाचा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurg Fort) साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्गात 70 लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत. यंदाच्या नौसेना दिनानिमित्त भारतीय नौसेनेच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहे. (india navy day 2023 4th december will be celebrated at sindhudurg fort president and pm will be present)

1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जो वज्राघात केला होता. परिणामी पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली होती. या वज्राघाताने भारतीय नौसेनेची खरी ताकद साऱ्या जगाला कळून चुकली आणि त्यामुळेच दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, जगात चौथ्या क्रमांकाची बलाढ्य नौसेना म्हणून भारतीय नौसेनेला जगात ओळखले जाते.

- Advertisement -

सिधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहास

25 नोव्हेंबर 1664 रोजी शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. शिवरायांच्या हस्ते ही पायाभरणी करण्यात आली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 500 खंडी शिशाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी शिवरायांनी मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट निवडले. हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. समुद्रावर ज्याचे वर्चस्व त्याचे जगावर वर्चस्व हे सूत्र शिवरायांनी सर्वप्रथम ओळखले. त्यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी किल्ल्यांची गरज असल्याचे शिवरायांनी जाणले. त्यानंतर अनेक जलदुर्गांची निर्मिती त्यांनी केली. त्यातील एक किल्ल्या म्हणजे सिंधुदुर्ग.

- Advertisement -

सिधुदुर्ग किल्ल्या वैशिष्ट्य

  • या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे 48 एकर आहे आणि त्यांचा तट दोन मैल इतका आहे.
  • या तटाची उंची 30 फूट तर रूंदी 12 फूट आहे.
  • या किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम असे 22 बुरुज आहेत.
  • सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत.
  • या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे.
  • हे मंदिर इ.स. 1695 साली शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.

हेही वाचा – ‘मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही…’, चार्ल्स डार्विनचा धडा पुस्तकातून काढल्याने आव्हाडांची भाजपावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -